Join us  

IPL 2023, CSK vs RCB Live : ११ चेंडूंत ५२ धावा! ग्लेन मॅक्सवेलने आधी समजून घेतले, कोवळ्या मलिंगाला धू धू धुतले; Video 

विराट कोहली व महिपाल लोम्रोर १५ धावांवर माघारी परतल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी वादळी खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 10:34 PM

Open in App

IPL 2023, Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live : विक्रमी २२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RCBला पहिल्याच षटकात झटका बसला. चेन्नईने आज ६ बाद २२६ धावा चोपल्या आणि आयपीएल इतिहासातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धची चिन्नास्वामीवरील सर्वोच्च धावसंख्या ठरली. विराट कोहली व महिपाल लोम्रोर १५ धावांवर माघारी परतल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी वादळी खेळी केली. या दोघांनी ४८ चेंडूंत शतकी भागीदारी करताना CSKच्या तोंडचा घास पळवण्याचा प्रयत्न केला. ज्युनियर मलिंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मथिशा पाथिरानाची मॅक्सवेलने चांगली धुलाई केली. 

दुर्दैवी विराट! बॅट, पॅड, बूट अन् स्टम्प; किंग कोहली बाद, अनुष्का शर्माचा पडला चेहरा, Video 

 

महेंद्रसिंग धोनीने इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आकाश सिंगला आणले अन् पहिले षटक दिले. त्याच्या पहिल्या दोन चेंडूवर २, ४ अशा धावा काढल्यानंतर विराटने तिसरा चेंडूवर चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण, तो दुर्दैवीरित्या त्रिफळाचीत झाला. पुढच्या चेंडूवर महिपाल लोम्रोरला जीवदान मिळाले अन् तुषार देशपांडेच्या षटकात फॅफ ड्यू प्लेसिसचा झेल घेण्यात धोनी अपयशी ठरला. पण, तुषारने लोम्रोरला शून्यावर माघारी पाठवले. फॅफ व ग्लेन मॅक्सवेल यांनी चांगली फटकेबाजी करताना अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. फॅफने २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि मॅक्सवेलसह त्याने ९ षटकांत RCBच्या फलकावर १०५ धावा चढवल्या. 

CSK विरुद्धचे हे RCBकडून झालेले दुसरे जलद अर्धशतक ठरले. २०१८मध्ये एबी डिव्हिलियर्सने २३ चेंडूंत हा पल्ला गाठलेला. मॅक्सवेलनेही २४ चेंडूंत आज अर्धशतक पूर्ण केले आणि फॅफसह शतकी भागीदारीही पूर्ण केली. या दोघांनी ४८ चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. ५२ धावांवर असताना फॅफचा आणखी एक झेल टाकला. तिक्षणाने त्याच्याच गोलंदाजीवर हा सोपा झेल टाकला. तिक्षणाच्या पुढच्या षटकात अखेर ही जोडी तुटली. मॅक्सवेलने मारलेला चेंडू हवेतच उत्तुंग उडाला अन् धोनीने अवघड झेल घेतला. मॅक्सवेल ३६ चेंडूंत ३ चौकार व ११ षटकारांसह ७६ धावांवर बाद झाला. मॅक्सवेल व फॅफची ६१ चेंडूंतील १२६ धावांची भागीदारी संपुष्टात आली.  

 " width="600" height="500" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen"> 

 

तत्पूर्वी, ऋतुराजला ( ३) स्वस्तात माघारी परतल्यानंतर RCB चे खेळाडू आनंदात होते, परंतु अजिंक्यने त्यांना रडकुंडीला आणले. त्याने कॉनवेसह ४३ चेंडूंत ७४ धावांची भागीदारी करताना २० चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३७ धावा चोपल्या. त्यानंतर शिवम दुबे आणि कॉनवे यांनी ३७ चेंडूंत ८० धावांची भागीदारी केली. कॉनवे ४५ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह ८३ धावांवर बाद झाला. दुबे २७ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५२ धावांवर माघारी परतला.  

 

टॅग्स :आयपीएल २०२३ग्लेन मॅक्सवेलरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेन्नई सुपर किंग्स
Open in App