IPL 2023, Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज चेन्नई सुपर किंग्सचे नाणे खणखणीत वाजले. आयपीएल इतिहासातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धची चिन्नास्वामीवरील सर्वोच्च धावसंख्या आज CSK ने नोंदवली. चेन्नईने आज ६ बाद २२६ धावा चोपल्या आणि २००८साली कोलकाता नाइट रायडर्सने नोंदवलेला २ बाद २२२ धावांचा विक्रम मोडला. डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांनी दमदार खेळ केला. दरम्यान, या सामन्यात हर्षल पटेलला २०वे षटक पूर्ण फेकू दिले नाही. दोन चेंडूनंतर अम्पायरने त्याला पुढील चेंडू टाकण्यास मनाई केली आणि ग्लेन मॅक्सवेलला उर्वरीत ४ चेंडू फेकावे लागले.
ऋतुराजला ( ३) स्वस्तात माघारी परतल्यानंतर RCB चे खेळाडू आनंदात होते, परंतु अजिंक्यने त्यांना रडकुंडीला आणले. त्याने कॉनवेसह ४३ चेंडूंत ७४ धावांची भागीदारी करताना २० चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३७ धावा चोपल्या. त्यानंतर शिवम दुबे आणि कॉनवे यांनी ३७ चेंडूंत ८० धावांची भागीदारी केली. कॉनवे ४५ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह ८३ धावांवर बाद झाला. दुबे २७ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५२ धावांवर माघारी परतला. हर्षलने २०व्या षटकात दोन फुलटॉस चेंडू ( No Ball) टाकल्याने त्याला षटक तिथेच सोडावे लागले. त्यामुळे ग्लेन मॅक्सवेल ४ चेंडू टाकण्यासाठी आला.
अखेरच्या दोन चेंडूंसाठी MS Dhoni फलंदाजीला आला अन् स्टेडियम दणाणून गेले. धोनी मैदानावर आला तेव्हा जिओ सिनेमाची व्ह्यूअर्सशीप २.२ कोटींवर गेली. दुसऱ्यांदा धोनीमुळे ही विक्रमी व्ह्यूअर्सशीप मिळाली.