Join us  

IPL 2023, CSK vs RCB Live : जखमी MS Dhoni खेळायला उतरला, चिन्नास्वामीवर एकच जल्लोष झाला; नाणेफेकीचा कौल RCB ने जिंकला

IPL 2023, Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली हे शेवटचं चिन्नास्वामी स्टेडियमवर एकत्र खेळणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 7:06 PM

Open in App

IPL 2023, Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली हे शेवटचं चिन्नास्वामी स्टेडियमवर एकत्र खेळणार आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार MS Dhoni याची ही शेवटची IPL स्पर्धा असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच सामना सुरू होण्याच्या जवळपास ३-४ तास आधीच प्रेक्षकांची स्टेडियमबाहेर भलीमोठी रांग पाहायला मिळाली. स्टेडियमवर CSK अन् माहीचाच जयघोष पाहायला मिळाला. RCBने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेकीला MS Dhoniला आलेलं पाहून चाहत्यांनी स्टेडियम डोक्यावर घेतलं.. गुडघ्याच्या दुखापतीमुळे धोनी खेळणार नसल्याची चर्चा होती. 

IPL 2023, MS Dhoni Retirement : महेंद्रसिंग धोनीचं निवृत्तीबाबत विधान! यंदाची आयपीएल शेवटची का? याचेही दिले उत्तर

रवींद्र जडेजाने आयपीएलमध्ये सहावेळा ग्लेन मॅक्सवेलला बाद केले आहेत. त्याशिवाय विराट कोहलीलाही तीनवेळा बाद केले आहे, परंतु कोहलीने १३१ चेंडूंत १४० धावा केल्या आहेत. धोनीने आयपीएलमध्ये मोहम्मद सिराजच्या २८ चेंडूंत ५१ धावा कुटल्या आहेत. कोहलीने आज २१ धावा केल्यास CSKविरुद्ध १००० धावांचा टप्पा तो ओलांडेल. धोनीने चिन्नास्वामी स्टेडियमवर १० सामन्यांत ९२.६ च्या सरासरीने ४६३ धावा केल्या आहेत. त्यात ५ अर्धशतकांचा समावेश आहे. धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे आणि तो लंगडताना दिसला. त्यामुळे आज तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळेल अशी चर्चा होती, परंतु धोनी प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसला.

बंगळुरूने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल केलेला नाही. चेन्नईच्या संघात सिसांडा मगालाच्या जागी पथिराना खेळणार आहे. 

चेन्नई सुपर किंग्स - ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महिशा पथिराना, महिषा तिक्षणा, तुषार देशपांडे

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस, महिपाल रोम्रोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, वेरॉन पार्नेल, मोहम्मद सिराज, वैशाख विजयकुमार 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App