IPL 2023, Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live : विक्रमी २२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RCBला पहिल्याच षटकात झटका बसला. चेन्नईने आज ६ बाद २२६ धावा चोपल्या आणि आयपीएल इतिहासातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धची चिन्नास्वामीवरील सर्वोच्च धावसंख्या ठरली. पहिल्याच षटकात CSKचा इम्पॅक्ट प्लेअर आकाश सिंगने विराटचा त्रिफळा उडवला.
ऋतुराजला ( ३) स्वस्तात माघारी परतल्यानंतर RCB चे खेळाडू आनंदात होते, परंतु अजिंक्यने त्यांना रडकुंडीला आणले. त्याने कॉनवेसह ४३ चेंडूंत ७४ धावांची भागीदारी करताना २० चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३७ धावा चोपल्या. त्यानंतर शिवम दुबे आणि कॉनवे यांनी ३७ चेंडूंत ८० धावांची भागीदारी केली. कॉनवे ४५ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह ८३ धावांवर बाद झाला. दुबे २७ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५२ धावांवर माघारी परतला.
महेंद्रसिंग धोनीने इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आकाश सिंगला आणले अन् पहिले षटक दिले. त्याच्या पहिल्या दोन चेंडूवर २, ४ अशा धावा काढल्यानंतर विराटने तिसरा चेंडूवर चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण, तो दुर्दैवी ठरला. आकाशने इनस्वींग चेंडू वेगाने मारला अन् विराटच्या बॅटवर आदळून तो पॅड, बूट असा प्रवास करत हळुहळू स्टम्पवर आदळला. केवळ एकच बेल्स पडली अन् विराटला माघारी जावे लागले. अनुष्का शर्मा नाराज झाली. आयपीएलमध्ये सर्वाधिक ३८ वेळा त्रिफळाचीत होण्याचा नकोसा विक्रम विराटने नावावर करताना शिखर धवन व शेन वॉटसन यांच्याशी बरोबरी केली.
" width="600" height="500" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen">
पुढच्या चेंडूवर महिपाल लोम्रोरला जीवदान मिळाले अन् तुषार देशपांडेच्या षटकात फॅफ ड्यू प्लेसिसचा झेल घेण्यात धोनी अपयशी ठरला. पण, तुषारने लोम्रोरला शून्यावर माघारी पाठवले. फॅफ व ग्लेन मॅक्सवेल यांनी चांगली फटकेबाजी करताना अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.
Web Title: IPL 2023, CSK vs RCB Live Marathi : Virat Kohli is out on 6 runs off 4 balls. Aakash Singh has got his wicket, Most bowled out Dismissals in IPL, RCB 15/2 (2), Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.