Join us  

IPL 2023, CSK vs RCB Live : MS Dhoni मैदानावर येताच अनुष्का शर्मा 'काहीतरी' म्हणाली! तुफान व्हायरल होतोय Video 

IPL 2023, Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( CSK vs RCB Highest Peak Viewership) यांच्या सामन्याने रेकॉर्ड मोडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 11:38 PM

Open in App

IPL 2023, Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( CSK vs RCB Highest Peak Viewership) यांच्या सामन्याने रेकॉर्ड मोडले. जिओ सिनेमावर आयपीएल २०२३ मध्ये सर्वाधिक म्हणजे २.४ कोटी लोकांनी ही मॅच पाहिली. यापूर्वी CSK vs RRच्या सामन्याला २.२ कोटी इतकी व्ह्यूअर्सशीप मिळाली होती. CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) मैदानावर येताच या व्ह्युअर्सशीपने २.२ कोटींचा आकडा आज पार केला अन् सामना थरारक वळणावर आल्यावर २.४ कोटींचा टप्पा गाठला. पण, याच सामन्यातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. CSKच्या डावातील २ चेंडू शिल्लक असताना धोनी फलंदाजीला आला तेव्हा RCBच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चिन्नास्वामीवर 'थाला'चा जयघोष झाला. त्याचवेळी कॅमेरा बॉलिवूड स्टार व  विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) कडे वळला अन् ती काहीतरी म्हणाली... 

प्रथम फलंदाजी करताना ऋतुराजला ( ३) स्वस्तात माघारी जावे लागले. पण, अजिंक्य रहाणे व  डेव्हॉन कॉनवे यांनी ४३ चेंडूंत ७४ धावांची भागीदारी केली. अजिंक्यने २० चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३७ धावा चोपल्या. त्यानंतर शिवम दुबे आणि कॉनवे यांनी ३७ चेंडूंत ८० धावांची भागीदारी केली. कॉनवे ४५ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह ८३ धावांवर बाद झाला. दुबे २७ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५२ धावांवर माघारी परतला.  चेन्नईने ६ बाद २२६ धावा केल्या आणि RCBविरुद्धची चिन्नास्वामी स्टेडियमवर ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली.

प्रत्युत्तरात इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या आकाश सिंगने पहिल्याच षटकात विराट कोहलीची ( ६) विकेट मिळवून दिली. त्यानंतर तुषार देशपांडेने महिपाल लोम्रोरला ( ०) माघारी पाठवले. फॅफ ड्यू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी CSKच्या गोलंदाजांनी चांगली धुलाई केली. मॅक्सवेल ३६ चेंडूंत ३ चौकार व ११ षटकारांसह ७६ धावांवर बाद झाला. मॅक्सवेल व फॅफची ६१ चेंडूंतील १२६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. फॅफ ३३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ६२ धावांवर धोनीच्या हाती झेलबाद झाला. त्यानंतर RCBचा डाव गडगडला अन् त्यांना ८ बाद २१८ धावाच करता आल्या. चेन्नईने ८ धावांनी हा सामना जिंकला.  

अनुष्का काय म्हणाली?महेंद्रसिंग धोनी जेव्हा फलंदाजीला आला अन् त्याच्याप्रती चाहत्याचं प्रेम पाहून अनुष्काही भारावून गेली... ती तिच्या शेजारी बसलेल्यांना सांगताना दिसली की, प्रेक्षकांचं धोनीवर खूप प्रेम आहे... 

टॅग्स :आयपीएल २०२३महेंद्रसिंग धोनीअनुष्का शर्माचेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App