IPL 2023, CSK vs RCB Live : ऋतुराजची विकेट मिळताच विराट कोहली नाचला, पण Ajinkya Rahaneचे वादळ पाहून हताश झाला 

IPL 2023, Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live : RCBने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेकीला MS Dhoniला आलेलं पाहून चाहत्यांनी स्टेडियम डोक्यावर घेतलं..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 08:21 PM2023-04-17T20:21:47+5:302023-04-17T20:25:52+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, CSK vs RCB Live: Virat Kohli dances after Rituraj's wicket, Ajinkya Rahane has been sent back by Wanindu Hasaranga. Rahane made a healthy contribution of 37 off 20.  | IPL 2023, CSK vs RCB Live : ऋतुराजची विकेट मिळताच विराट कोहली नाचला, पण Ajinkya Rahaneचे वादळ पाहून हताश झाला 

IPL 2023, CSK vs RCB Live : ऋतुराजची विकेट मिळताच विराट कोहली नाचला, पण Ajinkya Rahaneचे वादळ पाहून हताश झाला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live : RCBने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेकीला MS Dhoniला आलेलं पाहून चाहत्यांनी स्टेडियम डोक्यावर घेतलं.. गुडघ्याच्या दुखापतीमुळे धोनी खेळणार नसल्याची चर्चा होती.  धोनीने चिन्नास्वामी स्टेडियमवर १० सामन्यांत ९२.६ च्या सरासरीने ४६३ धावा केल्या आहेत. त्यात ५ अर्धशतकांचा समावेश आहे. धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे आणि तो लंगडताना दिसला. त्यामुळे आज तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळेल अशी चर्चा होती, परंतु धोनी प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसला. बंगळुरूने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल केलेला नाही. चेन्नईच्या संघात सिसांडा मगालाच्या जागी पथिराना खेळणार आहे. 

 झगा मगा, मला बघा! चेन्नई सुपर किंग्सला चिअर करण्यासाठी कोण आली बघा, BJPशी खास कनेक्शन


ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांच्यावर दडपण बनवण्यात RCBच्या गोलंदाजांना यश आले. तिसऱ्या षटकात मोहम्मद सिराजने टाकलेला चेंडू ऋतुराजने ( ३) उत्तुंग उडवला अन् सीमारेषेवर पार्नेलने सुरेख झेल टिपला. अजिंक्य रहाणे २.O आजही पाहायला मिळाला... अजिंक्यने काही सुरेख उत्तुंग फटके मारले आणि CSKच्या फॅन्सनी त्याला डोक्यावर घेतले. अजिंक्यच्या फटकेबाजीमुळे CSK ने पॉवर प्लेमध्ये १ बाद ५३ धावांपर्यंत मजल मारली. अजिंक्य व कॉनवे यांनी ३२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. ( ऋतुराज गायकवाडची विकेट, क्लिक करा


अजिंक्य व कॉनवे यांची ४३ चेंडूंतील ७४ धावांची भागीदारी वनिंदू हसरंगाने संपुष्टात आणली. अजिंक्य २० चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३७ धावांवर त्रिफळाचीत झाला. कॉनवेने ३२ चेंडूंत यंदाच्या आयपीएलमधील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. 

" width="600" height="500" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen">
 

" width="600" height="500" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen">
 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, CSK vs RCB Live: Virat Kohli dances after Rituraj's wicket, Ajinkya Rahane has been sent back by Wanindu Hasaranga. Rahane made a healthy contribution of 37 off 20. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.