IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सच्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात काही खास झाली नाही. फॉर्मात असलेला ऋतुराज गायकवाड ८ धावांवर माघारी परतला. पण, त्यानंतर अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane) आत्मविश्वासपूर्ण खेळ करताना डेव्हॉन कॉनवेसह दुसऱ्या विकेटसाठी सॉलिड भागीदारी करून CSKचा डाव सावरला. अजिंक्यच्या संयमाची इथे RRचा फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) याने परिक्षा घेण्याचा प्रयत्न केला अन् जिंक्सकडून त्याला जशासतसे उत्तर दिले.
रवींद्र जडेजाचा विक्रम; ठरला दमदार पराक्रम करणारा भारताचा पहिला डावखुरा गोलंदाज
राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल अपयशी ठरला, परंतु देवदत्त पडिक्कल आणि जॉस बटलर यांनी CSK गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. आर अश्विननेही चांगली फटकेबाजी केली. पडिक्कल व अश्विन या दोघांना मोईन अलीने स्लीपमध्ये झेल सोडून जीवदान दिले अन् तेच CSKला महागात पडले. पडिक्कल व बटलर यांनी ४१ चेंडूंत ७७ धावांची भागीदारी केली. पडिक्कल २६ चेंडूंत ५ चौकारांसह ३८ धावांवर झेलबाद झाला. अश्विनने २२ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह ३० धावांवर बाद झाला. बटलरने ३७ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावा केल्या. शेवटच्या षटकांत शिमरोन हेटमायरने १८ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून नाबाद ३० धावा केल्या. राजस्थानने ८ बाद १७५ धावा केल्या. रवींद्र जडेजा, आकाश सिंग व तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाडला ( ८) आज अपेक्षित सुरुवात करता आली नाही. संदीप शर्माने दुसऱ्या षटकात त्याला झेलबाद केले. डेव्हिड कॉनवेला जीवदान मिळाल. अॅडम झम्पाच्या गोलंदाजीवर संदीप शर्माने डीप स्क्वेअर लेगला हा झेल टाकला. या दोघांनी आतापर्यंत ४० चेंडूंत ६३ धावांची भागीदारी केली. अजिंक्यचे लक्ष विचलीत करण्यासाठी अश्विनने डाव खेळला. अजिंक्य पुढे येऊन फटका मारण्यासाठी येताच अश्विनने गोलंदाजी करणे टाळले. त्यानंतर पुढच्या चेंडूवर अश्विन गोलंदाजीसाठी क्रिजपर्यंत आल्यावर अजिंक्य बाजूला सरकला. अजिंक्यच्या या प्रतिक्रियेने स्टेडियमवर प्रेक्षक खूश झाले. त्यानंतर काही चेंडूनंतर अजिंक्यने खणखणीत षटकार खेचला. CSKच्या ९ षटकांत १ बाद ७६ धावा झाल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"