IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live : चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स आज चेन्नईच्या चेपॉक मैदानावर आमनेसामने आले आहेत. हा सामना चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी यासाठी मोठा आहे. आजचा दिवसही धोनीसाठी महत्वाचा आहे. कारण धोनी CSKचा कर्णधार म्हणून २०० वा सामना खेळत आहे. पण, RRचा सलामीवीर जॉस बटलरने ( jos Buttler) आजच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची नोंद केली.
आयपीएलच्या इतिहासात एकाच संघाचा कर्णधार म्हणून २००वा सामना खेळणार धोनी पहिलाच खेळाडू आहे. धोनीनंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा ( १४६) नंबर लागतो. महेंद्रसिंग धोनीने १९९ सामन्यांपैकी १२० सामने जिंकले आहेत, तर ७८ मध्ये हार पत्करावी लागली आहे. महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
यशस्वी जैस्वालने पहिल्या षटकात दोन सुरेख चौकार खेचून RRला सकारात्मक सुरूवात करून दिली. पण, दुसऱ्या षटकात तुषार देशपांडेच्या चेंडूवर फटका मारताना तो १० धावांवर बाद झाला. मोईन अलीकडून RRचा फलंदाज देवदत्त पडिक्कल याला जीवदान मिळाले. स्लीपमध्ये त्याचा झेल टाकला. पडिक्कल आज सुरेख फलंदाजी करताना दिसला अन् त्याने जॉस बटलरसह RRचा डाव सावरला. बटलरने १७वी धाव घेत आयपीएलमध्ये ३००० धावांचा टप्पा ओलांडला. त्याने ८५ इनिंग्जमध्ये ४०+च्या सरासरीने हा टप्पा ओलांडला. ख्रिस गेल ( ७५) व लोकेश राहुल ( ८०) यांच्यानंतर हा टप्पा ओलांडणारा तो तिसरा जलद फलंदाज ठरला. त्याने डेव्हिड वॉर्नर ( ९४) आणि ड्यू प्लेसिस ( ९४) यांचा विक्रम मोडला.