IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आज अपयशी ठरला. पण, देवदत्त पडिक्कल आणि जॉस बटलर यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांचा चांगला सामना केला. आर अश्विननेही चांगली फटकेबाजी केली. पडिक्कल व अश्विन या दोघांना मोईन अलीने स्लीपमध्ये झेल सोडून जीवदान दिले अन् तेच CSKला महागात पडले.
अजिंक्य रहाणे संघात असूनही MS Dhoniने दाखवला अविश्वास; घडले असे दोन प्रसंग, रवींद्र जडेजा संतापला
यशस्वी जैस्वालने ( १०) पहिल्या षटकात दोन सुरेख चौकार खेचले, परंतु तुषार देशपांडेचे दुसऱ्या षटकात त्याची विकेट घेतली. आज फलंदाजीला पॉवर प्लेच्या आत खेळण्याची संधी मिळालेल्या पडिक्कलचा झेल अलीने टाकला आणि त्यानंतर RR च्या फलंदाजाने अप्रतिम खेळ केला. पडिक्कल व बटलर यांनी ४१ चेंडूंत ७७ धावांची भागीदारी केली. पडिक्कल २६ चेंडूंत ५ चौकारांसह ३८ धावांवर झेलबाद झाला. रवींद्र जडेजाने पडिक्कलपाठोपाठ संजू सॅमसचा ( ०) त्रिफळा उडवला. पुढच्याच चेंडूवर अश्विनही बाद झाला असता, परंतु अलीने आणखी एक झेल सोडला. जडेजाने २१ धावांत २ विकेट्स घेतल्या.
अलीच्या चुकीच्या थ्रो मुळे अश्विन रन आऊट होता होता वाचला. दोन जीवदान मिळालेल्या अश्विनने १५व्या षटकात दोन खणखणीत षटकार खेचले. तिसऱ्यांदा चेंडू सीमापार पाठवण्याच्या प्रयत्नात अश्विन झेलबाद झाला. त्याने २२ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह ३० धावांवर बाद झाला. १७व्या षटकात अलीने RRला मोठा धक्का देताना जॉस बटलरचा त्रिफळा उडवला. बटलरने ३७ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावा केल्या. शेवटच्या षटकांत शिमरोन हेटमायरने चांगली फटकेबाजी करून CSK समोर आव्हानात्मक धावसंख्या उभ्या केल्या. त्याने १८ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून नाबाद ३० धावा केल्या. राजस्थानने ८ बाद १७५ धावा केल्या. आकाश सिंग व तुषार यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तुषारच्या गोलंदाजीवर एक सोपा झेल टाकला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, CSK vs RR Live Marathi : Jos Buttler scored 52 runs from 36 balls, Ravindra Jadeja take 2 wickets; Rajasthan Royals 175/8
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.