IPL 2023, CSK vs RR Live : जयपूरच्या हवेतच काहीतरी आहे; MS Dhoni चा संयम सुटतोच सुटतो, आजही त्याचा पारा चढला

IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Marathi : राजस्थान रॉयल्सने जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवरील आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्येची आज नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 09:43 PM2023-04-27T21:43:25+5:302023-04-27T21:46:35+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, CSK vs RR Live Marathi : MS Dhoni not happy with Pathirana for coming in way of his throw, Something about the air of Jaipur that brings out the grumpy Dhoni 😬 | IPL 2023, CSK vs RR Live : जयपूरच्या हवेतच काहीतरी आहे; MS Dhoni चा संयम सुटतोच सुटतो, आजही त्याचा पारा चढला

IPL 2023, CSK vs RR Live : जयपूरच्या हवेतच काहीतरी आहे; MS Dhoni चा संयम सुटतोच सुटतो, आजही त्याचा पारा चढला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Marathi : राजस्थान रॉयल्सने जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवरील आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्येची आज नोंद केली. चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांची धुलाई करताना RR ने ५ बाद २०२ धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात MS Dhoni चा पारा चढलेला पाहायला मिळाला. २०१९मध्ये जेव्हा CSK जयपूरमध्ये शेवटचे खेळले होते तेव्हाही कॅप्टन कूल भडकलेला दिसला अन् आजही तसेच काहीसे घडले. 

यशस्वी जैस्वालने ४३ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ७७ धावा केल्या आणि त्याने जॉस बटलरसह ( २७) पहिल्या विकेटसाठी ८६ धावा जोडल्या. संजू सॅमसन ( १७) आणि यशस्वी यांना तुषार देशपांडेने एकाच षटकात माघारी पाठवले अन् CSK ने डोकं वर काढले. RRच्या धावगतीला वेसण बांधण्यात CSKच्या गोलंदाजांना यश आले. तीक्षणाने कॅरम बॉलवर शिमरोन हेटमायरला ( ८) त्रिफळाचीत केले. देवदत्त पडिक्कल व ध्रुव जुरेल यांनी अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी करताना २० चेंडूंत ४८ धावा जोडल्या. जुरेल १५ चेंडूंत ३४ धावांवर रन आऊट झाला.  RRने ५ बाद २०२ धावांचा टप्पा गाठला. पडिक्कल १३ चेंडूंत २३ धावांवर नाबाद राहिला. जयपूरच्या स्टेडियमवरील ही आयपीएल मधील सर्वोच्च धावसंख्या ठरली.  

दरम्यान, मतिशा पथिराणावर कर्णधार धोनी भडकलेला दिसला. शिमरोन हेटमायरचा फटका पथिराणाच्या गोलंदाजीवर चुकला अन् तो धोनीच्या हाती गेला. जुरेलने एक धाव घेण्यासाठी क्रिज सोडलं अन् नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने पळणाऱ्या हेटमायरला बाद करण्यासाठी धोनीने थ्रो केला. पण, पथिराणाने मध्येच हात घातला अन् चेंडू रोखला गेला. हे पाहून धोनी काहीसा नाराज झाला.
 


२०१९मध्ये राजस्थानचा संघ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळला होता आणि तेव्हा RR ने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात, महेंद्रसिंग धोनी व अंबाती रायुडू यांनी अर्धशतकी केळी केली. रवींद्र जडेजा व मिचेल सँटनर यांनी चार विकेट्स राखून ही मॅच जिंकून दिली होती. पण, हा सामना लक्षात राहिला तो धोनीच्या वादग्रस्त कृतीमुळे. मैदानावरील अम्पायरच्या वादग्रस्त नो बॉलमुळे धोनी प्रचंड संतापला अन् थेट मैदानावर एन्ट्री घेत हुज्जत घालताना दिसला.


बेन स्टोक्सने २०वे षटक टाकले आणि ४ चेंडूंत ८ धावांची गरज होती. बेन स्टोक्सने चौथा चेंडू फुलटॉस टाकला अन् त्यावर जडेजा व सँटरन यांनी दोन धावा पळून काढल्या. मैदानावरील अम्पायर उल्हास गंधे यांनी सुरूवातीला नो बॉल असे जाहीर केले, परंतु लेग अम्पायर ब्रुस ऑस्केनफोर्ड यांनी तो निर्णय बदलला. कारण, हा चेंडू कमरेच्या वर होता की नव्हता हे त्यांना चांगले दिसले होते. या नंतर धोनी भडकला अन् मैदानावर आला आणि अम्पायरसोबत वाद घालू लागले. मैदानावर एकच गोंधळ आला, परंतु ऑस्केनफोर्ड यांनी त्यांचा निर्णय नाही बदलला.  

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, CSK vs RR Live Marathi : MS Dhoni not happy with Pathirana for coming in way of his throw, Something about the air of Jaipur that brings out the grumpy Dhoni 😬

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.