Join us  

IPL 2023, CSK vs RR Live : MS Dhoni अन् रवींद्र जडेजाचा संघर्ष अपयशी, 'यॉर्कर'ने मॅच फिरवली; RRने १५ वर्षांनी चेपॉकवर मॅच जिंकली

IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live : चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातला सामनाही अखेरच्या चेंडूपर्यंत गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 11:22 PM

Open in App

IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live : चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातला सामनाही अखेरच्या चेंडूपर्यंत गेला. अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) आणि डेव्हॉन कॉनवे यांनी चेन्नईला मॅच आणून दिली होती, परंतु राजस्थानच्या फिरकीपटूंनी मॅच फिरवली. रवींद्र जडेजा व महेंद्र सिंग धोनी हे अनुभवी फलंदाज मैदानावर असल्याने CSKच्या फॅन्सना विजयाची आशा होती. २००८ नंतर राजस्थान चेपॉकवर चेन्नईविरुद्ध कधीच जिंकले नव्हते, परंतु आज त्यांनी बाजी मारली. माही व सर जडेजा यांनी अखेरच्या चेंडूपर्यंत खिंड लढवली, परंतु विजयाच्या तीन धावा कमी पडल्या.  

उंदीर-मांजरीचे भांडण! आर अश्विनने संयमी अजिंक्य रहाणेला डिवचलं, जिंक्सनं सॉलिड उत्तर दिलं 

लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाडला ( ८) आज अपेक्षित सुरुवात करता आली नाही. संदीप शर्माने दुसऱ्या षटकात त्याला झेलबाद केले. डेव्हिड कॉनवेला जीवदान मिळाला. मागील सामन्यात दमदार खेळ करणाऱ्या अजिंक्य रहाणेची आजची खेळीही अप्रतिम होती. त्याच्या खेळात आत्मविश्वास दिसला आणि त्याने कॉनवेसोबत ६३ धावांची भागीदारी केली. अजिंक्यला बाद करण्यासाठी RR ने आर अश्विनला गोलंदाजीला आणले. पहिल्या षटकात अजिंक्यने त्याला झोडले आणि त्यांच्यात चांगली स्पर्धा पाहायला मिळाली. पण, पुढील षटकांत अश्विनच्या फिरकीवर अजिंक्य ३१ धावांवर ( १९ चेंडू) पायचीत झाला. पुढच्या षटकात अश्विनने आणखी एक विकेट घेताना शिवम दुबेला ( ८) पायचीत केले. शिवमने DRS घेतला असता तर तो वाचला असता.

RRच्या फिरकीपटूंनी CSK च्या धावा आटवल्या होत्या आणि त्यामुळे गरजेची सरासरी १२ च्या वर गेली होती. ती कमी करण्याच्या प्रयत्नात मोईन अलीने ( ७) फटका मारला, परंतु झम्पाने टाकलेला चेंडू डिप स्क्वेअर लेगला संदीप शर्माने टिपला. अंबाती रायुडू पुन्हा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर आला. चेन्नईला ३६ चेंडूंत विजयासाठी ७३ धावा करायच्या होत्या. पण, चहलने रायुडूला झेलबाद करून माघारी पाठवले. कॉनवेला ( ५०) चहलने बाद केले. राजस्थानच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात अप्रतिम कामगिरी करून दाखवली. महेंद्रसिंग धोनी मैदानावर येताच स्टेडियम दणाणून गेले. पण, CSKला २४ चेंडूंत अजूनही ५९ धावा करायच्या होत्या.

अश्विनने २५ धावांत २, तर चहलने २७ धावांत २ विकेट्स घेतल्या. १८ चेंडूंत ५४ धावा अशी मॅच आल्याने CSKचे फॅन चिंतेत दिसले. झम्पाने टाकलेल्या १८व्या षटकात धोनीने चौकार-षटकार खेचून १५ धावा जोडल्या. १२ चेंडूंत ४० धावा चेन्नईला करायच्या होत्या. जेसन होल्डर १९वं षटक टाकण्यासाठी आला अन् जडेजाने १९ धावा चोपल्याने ६ चेंडू २१ असा सामना आला. संदीप शर्मा २०वं षटक टाकताना दडपणात दिसला आणि त्याने सलग दोन Wide चेंडू टाकले. त्यानंतर धोनीने सलग दोन षटकार खेचले अन् ३ चेंडू ७ अशी मॅच आली. १ चेंडूंत ५ धावांची गरज असताना माही स्ट्राईकवर आला अन् धोनीला एकच धाव घेता आली. चेन्नईने ६ बाद १७२ धावा केल्या अन् राजस्थानने ३ धावांनी जिंकला. धोनी १७ चेंडूंत ३२,तर जडेजा १५ चेंडूंत २५ धावांवर नाबाद राहिला.

तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. देवदत्त पडिक्कल ( ३८) आणि जॉस बटलर यांनी CSK गोलंदाजांचा चांगला समाचार घेताना ७७ धावांची भागीदारी केली. आर अश्विनने २२ चेंडूंत ३० धावा केल्या. बटलरने ३७ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावा केल्या. शिमरोन हेटमायरने १८ चेंडूंत नाबाद ३० धावा करून राजस्थानला ८ बाद १७५ धावांपर्यंत पोहोचवले. रवींद्र जडेजा, आकाश सिंग व तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.  

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्समहेंद्रसिंग धोनी
Open in App