IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आज अपयशी ठरला. पण, देवदत्त पडिक्कल आणि जॉस बटलर यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांचा चांगला सामना केला. मागील सामन्यात वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्या अजिंक्य रहाणेला ( Ajinkya Rahane) आज MS Dhoni ने प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवले, परंतु त्याच्यावर अविश्वास दाखवल्याची भावना चाहत्यांमध्ये निर्माण झाली. सामन्यात असे दोन प्रसंग घडले ज्यावरून याची चर्चा सुरू झाली आहे.
MS Dhoniच्या विक्रमी सामन्यात जॉस बटलरचा मोठा पराक्रम; मोडला डेव्हिड वॉर्नरचा विक्रम
यशस्वी जैस्वालने पहिल्या षटकात दोन सुरेख चौकार खेचून RRला सकारात्मक सुरूवात करून दिली. पण, दुसऱ्या षटकात तुषार देशपांडेच्या चेंडूवर फटका मारताना तो १० धावांवर बाद झाला. मोईन अलीकडून RRचा फलंदाज देवदत्त पडिक्कल याला जीवदान मिळाले. स्लीपमध्ये त्याचा झेल टाकला. पडिक्कलने आज सुरेख फलंदाजी केली. बटलरने १७वी धाव घेत आयपीएलमध्ये ३००० धावांचा टप्पा ओलांडला. रवींद्र जडेजाने त्याच्या दुसऱ्या षटकात RRला धक्का दिला. पडिक्कल व बटलर यांची ४१ चेंडूंत ७७ धावांची भागीदारी त्याने मोडली. पडिक्कल २६ चेंडूंत ५ चौकारांसह ३८ धावांवर झेलबाद झाला.
त्याच षटकात जडेजाने अप्रतिम चेंडूवर संजू सॅमसचा ( ०) त्रिफळा उडवला. संजूला चेंडूचा अंदाजच बांधता नाही आला, एवढ्या वेगाने चेंडू वळला. यासह जडेजाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २०० विकेट्स पूर्ण केल्या. सहाव्या चेंडूवर आर अश्विनचा स्लीपमध्ये झेल उडाला होता, परंतु मोईन अलीच्या हातून तो सुटला. स्लीपमधील सर्वोत्तम खेळाडू अजिंक्य रहाणे संघात असूनही धोनीने अलीला त्या ठिकाणी उभं केल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. त्याय अलीने दोन झेल टाकून धोनीच्या रणनीतीवर शंका उपस्थित केली. अनेकांच्या मते रहाणे स्लीपमध्ये असायला हवा होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"