IPL 2023, CSK vs RR Live : राजस्थान रॉयल्सची 'यशस्वी' फलंदाजी; जयपूरच्या स्टेडियमवर उभारली सर्वोच्च धावसंख्या

IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Marathi : यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 09:12 PM2023-04-27T21:12:04+5:302023-04-27T21:17:07+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, CSK vs RR Live Marathi : Yashasvi Jaiswal scored 77 runs in 43 balls, History: Rajasthan scored the highest total ever in Jaipur stadium in IPL - 202 for 5 from 20 overs. | IPL 2023, CSK vs RR Live : राजस्थान रॉयल्सची 'यशस्वी' फलंदाजी; जयपूरच्या स्टेडियमवर उभारली सर्वोच्च धावसंख्या

IPL 2023, CSK vs RR Live : राजस्थान रॉयल्सची 'यशस्वी' फलंदाजी; जयपूरच्या स्टेडियमवर उभारली सर्वोच्च धावसंख्या

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Marathi : यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली. त्याने जॉस बटलरसह राजस्थान रॉयल्ससाठी मजबूत पाया रचून दिला. पण,  तुषार देशपांडेने एकाच षटकात दोन विकेट्स घेत CSKला सामन्यात डोकं वर काढून दिले. यशस्वी बाद झाल्यानंतर RRची धावगती किंचीतशी मंदावली.

१२ चेंडूंत ५६ धावा! यशस्वी जैस्वाल कसला खेळला भावा... चेन्नईच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले


यशस्वीने पहिल्याच षटकात ३ आकर्षक चौकार खेचून १४ धावा मिळवल्या. जॉस बटलरनेही त्याला चांगली साथ दिली. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर यशस्वीने मारलेला उलटा सुपला अप्रतिम होता. पण, जडेजाने CSKला पहिले यश मिळवून देताना बटलरला ( २७) बाद केले. ८६ धावांची भागीदारी नवव्या षटकांत संपुष्टात आली. संजू सॅमसन ( १७) तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याच षटकात देशपांडेने मोठी विकेट घेतली. जैस्वाल ४३ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ७७ धावांवर अजिंक्य रहाणेच्या हाती झेलबाद झाला. 


एकाच षटकात दोन धक्के बसल्यानंतर RRच्या धावगतीला वेसण बांधण्यात CSKच्या गोलंदाजांना यश आले. तीक्षणाने कॅरम बॉलवर शिमरोन हेटमायरला ( ८) त्रिफळाचीत केले. देवदत्त पडिक्कल व ध्रुव जुरेल यांनी अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी करताना २० चेंडूंत ४८ धावा जोडल्या. जुरेल १५ चेंडूंत ३४ धावांवर रन आऊट झाला.  RRने ५ बाद २०२ धावांचा टप्पा गाठला. पडिक्कल १३ चेंडूंत २३ धावांवर नाबाद राहिला. जयपूरच्या स्टेडियमवरील ही आयपीेएल मधील सर्वोच्च धावसंख्या ठरली.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, CSK vs RR Live Marathi : Yashasvi Jaiswal scored 77 runs in 43 balls, History: Rajasthan scored the highest total ever in Jaipur stadium in IPL - 202 for 5 from 20 overs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.