IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Marathi : यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) व जॉस बटलर या जोडीने राजस्थान रॉयल्सला ८६ धावांची दमदार सलामी दिली. चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी युवा फलंदाज जैस्वालने चांगलीच धुलाई केली आणि त्याने २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. जैस्वालने यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नावावर असलेला मोठा विक्रम मोडला.
इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात हायव्होल्टेज सामना सुरू झाला आहे. मागच्या वेळेत २०१९मध्ये जेव्हा उभय संघ जयपूरच्या सवाई मान सिंग स्टेडियमवर भिडले होते, तेव्हा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni Angry) रुद्रावतार सर्वांनी पाहिला होता. संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या षटकात विकेट घेण्यात विक्रमी कामगिरी करणारा ट्रेंट बोल्ट आजच्या सामन्यात खेळणार नसल्याने RRच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. रवींद्र जडेजाचा हा CSKकडून १५० वा सामना आहे आणि महेंद्रसिंग धोनी ( २१२), सुरेश रैना ( १७६) यांच्यानंतर त्याने चेन्नईसाठी सर्वाधिक मॅच खेळल्या.
यशस्वी जैस्वालने पहिल्याच षटकात आकाश सिंगला तीन आकर्षक चौकार खेचून १४ धावा मिळवल्या. जॉस बटलरनेही त्याला चांगली साथ दिली. यशस्वीने आकाशच्या दुसऱ्या षटकातही चौकार-षटकार खेचला. महीष तीक्षणाने टाकलेल्या चौथ्या षटकात यशस्वीसाठी LBW ची जोरदार अपील झाले, परंतु काही उपयोग झाला नाही. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये ६४ धावा कुटल्या. रवींद्रच्या गोलंदाजीवर जैस्वालने मारलेला उलटा सुपला अप्रतिम होता. त्याने २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. जडेजाने CSKला पहिले यश मिळवून देताना बटलरला ( २७) बाद केले. ८६ धावांची भागीदारी नवव्या षटकांत संपुष्टात आली. यंदाच्या आयपीएलमध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत जैस्वालने ( १८६) दुसरे स्थान पटकावले आणि विराट कोहलीला ( १७५ ) मागे टाकले. फॅफ ड्यू प्लेसिस २०१ धावांसह आघाडीवर आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, CSK vs RR Live Marathi : Yashasvi Jaiswal scored Most runs in Powerplay (2023 IPL), he break Virat Kohli record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.