IPL 2023, CSK vs RR Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा हायव्होल्टेज सामना होणार आहे. IPL 2023 पहिल्या लढतीत राजस्थानने चेन्नई येथे CSKवर ३ धावांनी विजय मिळवला आहे. आता परतीच्या सामन्यात CSK त्याची परतफेड करण्यास उत्सुक आहेत. मागच्या वेळेत २०१९मध्ये जेव्हा उभय संघ जयपूरच्या सवाई मान सिंग स्टेडियमवर भिडले होते, तेव्हा खूप मोठा राडा झालेला... कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni Angry) रुद्रावतार सर्वांनी पाहिला होता.
देशासाठी खेळणं सोडा आम्ही ५१ कोटी देतो; IPL फ्रँचायझीचं आंतरराष्ट्रीय खेळाडूंना पैशांच आमीष?
२०१९मध्ये राजस्थानचा संघ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळला होता आणि तेव्हा RR ने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात, महेंद्रसिंग धोनी व अंबाती रायुडू यांनी अर्धशतकी केळी केली. रवींद्र जडेजा व मिचेल सँटनर यांनी चार विकेट्स राखून ही मॅच जिंकून दिली होती. पण, हा सामना लक्षात राहिला तो धोनीच्या वादग्रस्त कृतीमुळे. मैदानावरील अम्पायरच्या वादग्रस्त नो बॉलमुळे धोनी प्रचंड संतापला अन् थेट मैदानावर एन्ट्री घेत हुज्जत घालताना दिसला.
बेन स्टोक्सने २०वे षटक टाकले आणि ४ चेंडूंत ८ धावांची गरज होती. बेन स्टोक्सने चौथा चेंडू फुलटॉस टाकला अन् त्यावर जडेजा व सँटरन यांनी दोन धावा पळून काढल्या. मैदानावरील अम्पायर उल्हास गंधे यांनी सुरूवातीला नो बॉल असे जाहीर केले, परंतु लेग अम्पायर ब्रुस ऑस्केनफोर्ड यांनी तो निर्णय बदलला. कारण, हा चेंडू कमरेच्या वर होता की नव्हता हे त्यांना चांगले दिसले होते. या नंतर धोनी भडकला अन् मैदानावर आला आणि अम्पायरसोबत वाद घालू लागले. मैदानावर एकच गोंधळ आला, परंतु ऑस्केनफोर्ड यांनी त्यांचा निर्णय नाही बदलला.
या नो बॉल ड्रामानंतर सँटनर व जडेजा यांनी पुन्हा दोन धावा काढल्या, त्यानंतर स्टोक्सने वाईड बॉल टाकला. १ चेंडू ३ धावा असा सामना आला अन् सँटनरने षटकार केचून मॅच जिंकून दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"