Join us  

IPL 2023 CSK vs RR: चेन्नईला शेवटच्या चेंडूवर दिली मात, तरीही संजू सॅमसनला बसला लाखोंचा फटका

कोणत्याही कर्णधाराला विजयानंतर असे काही घडावे असे वाटत नाही, पण IPLच्या प्रत्येक हंगामात अशा दोन-तीन घटना घडतच असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 9:43 AM

Open in App

MS Dhoni Sanju Samson, IPL 2023 CSK vs RR: एकीकडे चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये पराभूत केल्याचा आनंद तर दुसरीकडे लाखो रुपयांच्या नुकसानीचे दुःख. राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला या दोन्ही गोष्टी एकाच सामन्यात पाहायला मिळाल्या. राजस्थानने CSKला त्यांच्याच गडावर म्हणजेच चेपॉकवर पराभूत करून आनंद साजरा केला. पण, त्यानंतर संजू सॅमसनला मोठा फटका बसला. कोणत्याही कर्णधाराला विजयानंतर असे काही घडावे असे वाटत नाही, पण आयपीएलच्या प्रत्येक मोसमात अशा दोन-तीन घटना घडतच असतात.

संजू सॅमसन सामन्यात मोठा दंड भरावा लागला. आयपीएलच्या आचारसंहितेशी संबंधित स्लो ओव्हर रेटच्या नियमांच्या उल्लंघनाबद्दल हा दंड होता. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला. राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जकडून अत्यंत रोमांचकारी पद्धतीने सामना जिंकला. पण त्यानंतर त्याचा कर्णधार संजू सॅमसनला स्लो ओव्हर रेटसाठी १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. याचा अर्थ, सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, CSK ला पराभूत करण्याच्या प्रक्रियेत त्याला 12 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

दंड भरणारा दुसरा कर्णधार

या मोसमात सहभागी होणारा संजू सॅमसन हा दुसरा कर्णधार आहे. त्याच्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसलाही यासाठी शिक्षा झाली आहे. मात्र, एवढ्या पराभवानंतरही संजू सॅमसनच्या राजस्थानला विजय मिळाला ती चांगली गोष्ट झाली. तो शानदार विजय राजस्थान रॉयल्सने मिळवला. हा विजय त्याच्यासाठी स्पर्धेत पुढे जाण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच, चेन्नईमध्ये 15 वर्षांनी सीएसकेचा पराभव केल्याने त्यांचे मनोबलही वाढले आहे.

दरम्यान, या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 विकेट गमावत 175 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जला लक्ष्याचा पाठलाग करताना केवळ 172 धावा करता आल्या आणि सामना 3 धावांनी गमावला. चेन्नईचा हा 4 सामन्यातील दुसरा पराभव आहे. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सला 4 सामन्यांमध्ये तिसरा विजय मिळाला.

टॅग्स :आयपीएल २०२३संजू सॅमसनमहेंद्रसिंग धोनीराजस्थान रॉयल्सचेन्नई सुपर किंग्स
Open in App