IPL 2023, CSK vs RR : रवींद्र जडेजाचा विक्रम; ठरला दमदार पराक्रम करणारा भारताचा पहिला डावखुरा गोलंदाज

IPL 2023, CSK vs RR : चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings ) स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) आज ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 09:59 PM2023-04-12T21:59:54+5:302023-04-12T22:00:27+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, CSK vs RR : Ravindra Jadeja becomes 1st Indian left-arm spinner to achieve this feat in T20s, equals R Ashwin’s CSK record too | IPL 2023, CSK vs RR : रवींद्र जडेजाचा विक्रम; ठरला दमदार पराक्रम करणारा भारताचा पहिला डावखुरा गोलंदाज

IPL 2023, CSK vs RR : रवींद्र जडेजाचा विक्रम; ठरला दमदार पराक्रम करणारा भारताचा पहिला डावखुरा गोलंदाज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, CSK vs RR : चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings ) स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) आज ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २०० विकेट्स घेणारा भारताचा पहिला डावखुरा गोलंदाज ठरला. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात जडेजाने कर्णधार संजू सॅमसनचा त्रिफळा उडवून हा टप्पा गाठला. आजच्या सामन्यात त्याने २१ धावा देताना दोन विकेट्स घेतल्या. यासह त्याने CSKकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या आर अश्विनच्याही विक्रमाशी बरोबरी केली.  

अश्विनने २००९ ते २०१५ या कालावधीत चेन्नईकडून खेळताना १२१ सामन्यांत २३.७०च्या सरासरीने १२० विकेट्स घेतल्या होत्या. जडेजाने १६० सामना केळताना २८.१६च्या सरासरीसह आज १२० विकेट्स पूर्ण केल्या. ट्वेंटी-२०त दोनशे विकेट्स घेणारा जडेजा हा भारताचा पहिला डावखुरा फिरकी गोलंदाज ठरला. मुंबई इंडियन्सचा जयदेव उनाडकत हा २०० विकेट्स घेणारा भारताचा पहिला डावखुरा जलदगती गोलंदाज आहे. 

ट्वेंटी-२०त २००+ विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज ( आयपीएल, स्थानिक स्पर्धा, आंतरराष्ट्रीय)  
युझवेंद्र चहल - ३०७
आर अश्विन - २९१ 
पीयुष चावला - २८०
अमित मिश्रा - २७५ 
भुवनेश्वर कुमार - २५८ 
जसप्रीत बुमराह - २५६ 
हरभजन सिंग - २३५ 
जयदेव उनाडकत - २१०
रवींद्र जडेजा - २०० 

 

Web Title: IPL 2023, CSK vs RR : Ravindra Jadeja becomes 1st Indian left-arm spinner to achieve this feat in T20s, equals R Ashwin’s CSK record too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.