IPL 2023, CSK vs SRH : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये काल सनरायझर्स हैदराबादवर विजयाची नोंद केली. महेंद्रसिंग धोनीची ( MS Dhoni) ही अखेरची आयपीएल म्हटली जात आहे आणि त्यानेही त्याच्या नुकत्याच काही विधानांतून तसे संकेतही दिले आहेत. भारतीय क्रिकेटमधील सर्वात चतुर कर्णधार अशी धोनीची ओळख आहे आणि ती का याची वारंवार प्रचिती त्याने घडवून आणली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या कालच्या सामन्यातही ते जाणवले. समोरच्या फलंदाजाला कधी व कसे सापळ्यात अडकवायचे, हे धोनी चांगल्या पद्धतीने जाणवतो आणि काल SRHच्या फलंदाजाला त्याने चतुराईने माघारी पाठवले
चेपॉकवर झालेल्या या सामन्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. धोनीने क्षेत्ररक्षणात एक बदल केला आणि पुढच्याच चेंडूवर ऋतुराज गायकवाडने अफलातून झेल गेला. रवींद्र जडेजाने या विकेटला गेम चेंजिंग म्हटले आहे. SRHच्या डावातील पावच्या षटकातील हा प्रसंग आहे. हॅरी ब्रुक व अभिषेक शर्मा यांनी २४ चेंडूंत ३४ धावांची भागीदारी केली होती. पाचव्या षटकाच्या दुसरा चेंडू टाकण्यापूर्वी धोनीने ऋतुराजला बॅकवर्ड पॉईंट आणि शॉर्ट थर्ड या जागांच्या मधोमध उभे केले. पुढच्याच चेंडूवर ब्रूकचा झेल त्याच दिशेने आला अन् ऋतुराजने तो टिपला. आकाश सिंगच्या गोलंदाजीवर ब्रुकची विकेट पडली.
ऋतुराजचा तो झेल कॅच ऑफ दी मॅच ठरली. त्यानंतर धोनीने बोलता बोलता हसत-हसत 'कॅच ऑफ द मॅच' पुरस्काराची मागणी केली. धोनी म्हणाला की, उत्तम झेल घेऊनही मला पुरस्कार मिळत नाही. फक्त मी यष्टिरक्षक आहे म्हणून आणि आमच्या हातात ग्लोव्ह्ज असतात म्हणून काहींना वाटतं की तो सोपा झेल असतो. पण असे अजिबात नसते."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"