IPL 2023, Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्स विजयाच्या उंबरठ्यावर असताना अम्पायरने १६व्या षटकात परस्पर एक निर्णय घेतला अन् त्यावर महेंद्रसिंग धोनी खवळला. त्याने अम्पायरच्या निर्णयावर प्रचंड नाराजी व्यक्त केली.
लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकात तुषार देशपांडेने दिल्लीला मोठा धक्का दिला. पृथ्वी शॉ ( ५) याचा अंबाती रायुडूने अफलातून झेल घेतला. डेव्हिड वॉर्नर आणि फिल सॉल्ट यांनी २२ धावांची भागीदारी करून DCचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पाचव्या षटकात दीपक चहरने दोन धक्के दिले. वॉर्नरने षटकार व चौकाराने या षटकाची सुरुवात केली. पण, फिल सॉल्ट ( ३) आणि रिली रोसू ( ०) यांना माघारी पाठवून CSKला पुन्हा फ्रंटसीटवर बसवले. वॉर्नर एकटा खिंड लढवताना दिसला.. यंदाच्या पर्वात वॉर्नर वगळल्यास दिल्लीच्या एकाही फलंदाजाला सातत्य राखता आलेले नाही आणि हेच त्यांच्या अपयशाचे प्रमुख कारण ठरले आहे.
आयपीएलच्या काही महत्त्वाच्या बातम्या
६,६,१,१,६,६,६! ऋतुराज गायकवाडचे वादळी अर्धशतक, ७ चेंडूंत कुटल्या ३२ धावा, Video
डॅनी मॉरिसनने 'खुणवाखुणवी' करून MS Dhoni ला विचारला प्रश्न, जाणून घ्या कारण
डेव्हिड वॉर्नरचं 'Sword' सेलिब्रेशन; रवींद्र जडेजाने दिली टशन; पाहा Video
वॉर्नरने ३३ चेंडूंत आणखी एक अर्धशतक पूर्ण केले, परंतु दिल्लीला ६० चेंडूंत १५२ धावांची गरज होती आणि ते अशक्य होते. वॉर्नर व यश धूल ( १३) यांची ४९ धावांची भागीदारी रवींद्र जडेजाने तोडली. पण, जडेजाच्या पुढच्या षटकात वॉर्नर ( ४,६,६) आणि अक्षर पटेल ( ६,१) यांनी २३ धावा चोपून काढल्या. दीपक चहरने तिसरी विकेट घेताना अक्षरला ( १५) माघारी पाठवले. दिल्लीचा निम्मा संध १०९ धावांत तंबूत परतला. वॉर्नरने यंदाही ५००+ धावा केल्या आणि आयपीएल इतिहासात सातवेळा असा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला. ३६ चेंडूंत ११४ धावा DCला करायच्या होत्या. १४ षटकानंतर अम्पयारने नवा चेंडू घेतला अन् त्यावर धोनी नाराज झाला. तो जुना चेंडू व नवा चेंडू यांच्यातला फरक अम्पायरला समजवताना दिसलाय