Join us  

IPL 2023, DC vs CSK Live : चेन्नई सुपर किंग्स Play Offs मध्ये; क्वालिफायर १ मध्ये खेळणार का? पाहा गणित

IPL 2023, Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या प्ले ऑफमधील स्थान पक्के केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 7:13 PM

Open in App

IPL 2023, Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या प्ले ऑफमधील स्थान पक्के केले आहे. गतविजेत्या गुजरात टायटन्सनंतर प्ले ऑफसाठी पात्र ठरलेला तो दुसरा संघ ठरला. CSK ने उभ्या केलेलं २२४ धावांचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सला पेलवलं नाही आणि त्यांचा पराभव झाला. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ( David Warner) पुन्हा एकहाती किल्ला लढवला. चेन्नईने १४ सामन्यांत १७ गुणांसह स्वतःला क्वालिफायर १च्या शर्यतीत आघाडीवर ठेवले आहे. लखनौ सुपर जायंट्सने संध्याकाळचा सामना जिंकल्यास नेट रन रेटवर क्वालिफायर १मध्ये गुजरात टायटन्सचा कोण सामना करेल हे ठरणार आहे. 

मागील सामन्यात दमदार खेळ करणारा पृथ्वी शॉ ( ५) दुसऱ्याच षटकात बाद झाला. डेव्हिड वॉर्नर आणि फिल सॉल्ट यांनी २२ धावांची भागीदारी करून DCचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, दीपक चहरने सॉल्ट ( ३)  आणि रिली रोसू ( ०) यांना सलग चेंडूंवर माघारी पाठवले. वॉर्नर एकटा खिंड लढवताना दिसला. वॉर्नर व यश धूल ( १३) यांनी ४९ धावांची भागीदारी करताना कमबॅकचा प्रयत्न केला. अक्षर पटेलही ( १५) फेल ठरला अन् दीपक चहरचा ( ३-२२) तो आजच्या सामन्यातला तिसरा बळी ठरला.

अमन खान ( ७) माघारी परतल्याने दिल्लीचा पराभव निश्चित झाला. वॉर्नर एकहाती किल्ला लढवताना दिसला, पंरतु समोरून त्याला साथ मिळालीच नाही. वॉर्रन ५८ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ८६ धावांवर झेलबाद झाला.  मथिशा पथिराणाच्या (२-२२) गोलंदाजीवर ऋतुराजने अफलातून झेल घेतला. महिष थिक्षाणाने २०व्या षटकात सलग दोन विकेट्स घेतल्या. त्याची हॅटट्रिक मिस झाली, परंतु दिल्लीला ९ बाद १४६ धावा करता आल्या आणि चेन्नईने ७७ धावांनी विजय मिळवला. 

आयपीएलच्या काही महत्त्वाच्या बातम्या

६,६,१,१,६,६,६! ऋतुराज गायकवाडचे वादळी अर्धशतक, ७ चेंडूंत कुटल्या ३२ धावा, Video 

डेव्हिड वॉर्नरचं 'Sword' सेलिब्रेशन; रवींद्र जडेजाने दिली टशन; पाहा Video 

महेंद्रसिंग धोनीचा 'पारा' चढला, अम्पायरच्या निर्णयावर हुज्जत घालताना दिसला

तत्पूर्वी, ऋतुराज ( ५० चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांसह ७९ धावा) आणि डेव्हॉन ( ५२ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ८७ धावा) या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी करताना CSKचा पाया मजबूत केला. कॉनवे व शिवम दुबे ( २२) यांनी २२ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी पूर्ण केली. रवींद्र जडेजा ( २०*) आणि धोनी ( ५) यांनी अखेरच्या दोन षटकांत २२ धावा जोडून संघाला ३ बाद २२३ धावांपर्यंत पोहोचवले. ही दिल्लीतील दुसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली. २०११ मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सने ४ बाद २३१ धावा केल्या होत्या. 

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्सडेव्हिड वॉर्नर
Open in App