IPL 2023, Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Marathi : प्ले ऑफसाठी विजयाच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सने ३ बाद २२३ धावांचा डोंगर उभा केला. दिल्ली कॅपिटल्सला हा भार पेलवला नाही आणि त्यांचे ३ फलंदाज २६ धावांवर माघारी परतले. कर्णधार डेव्हिड वॉर्नर एकटा खिंड लढवतोय, परंतु त्याचा आणि रवींद्र जडेजाचा वेगळाच सामना पाहायला मिळाला. प्रेक्षकांनीही तो क्षण टिपला अन् एकच जल्लोष केला.
ऋतुराज आणि डेव्हॉन या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी करताना CSKचा पाया मजबूत केला. ऋतुराज ५० चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांसह ७९ धावांवर माघारी परतल्यानंतर कॉनवेने गिअर बदलला. कॉनवे व शिवम दुबे ( २२) यांनी २२ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी पूर्ण केली. अखेरची दोन षटकं खेळण्यासाठी MS Dhoni क्रिजवर आला अन् स्टेडियमवर माही माही नावाचा जयघोष झाला. कॉनवे ५२ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ८७ धावांवर माघारी परतला. रवींद्र जडेजा ( २०*) आणि धोनी ( ५) यांनी अखेरच्या दोन षटकांत २२ धावा जोडून संघाला ३ बाद २२३ धावांपर्यंत पोहोचवले
आयपीएलच्या काही महत्त्वाच्या बातम्या
६,६,१,१,६,६,६! ऋतुराज गायकवाडचे वादळी अर्धशतक, ७ चेंडूंत कुटल्या ३२ धावा, Video
डॅनी मॉरिसनने 'खुणवाखुणवी' करून MS Dhoni ला विचारला प्रश्न, जाणून घ्या कारण
प्रत्युत्तरात, दुसऱ्या षटकात तुषार देशपांडेने दिल्लीला मोठा धक्का दिला. पृथ्वी शॉ ( ५) याचा अंबाती रायुडूने अफलातून झेल घेतला. डेव्हिड वॉर्नर आणि फिल सॉल्ट यांनी २२ धावांची भागीदारी करून DCचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पाचव्या षटकात दीपक चहरने दोन धक्के दिले. वॉर्नरने षटकार व चौकाराने या षटकाची सुरुवात केली. तिसऱ्या चेंडूवर १ धाव घेतली. पण, यावेळी दुसऱ्या धावेसाठी वॉर्नरचा प्रयत्न होता अन् अजिंक्य रहाणेने थ्रो केला. चेंडू दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या रवींद्र जडेजाच्या हातात गेला. तेव्हाही वॉर्नरने धाव घेण्याची हूल दिली अन् जडेजा यष्टिंचा वेध घेण्यासाठी सज्ज होताच. वॉर्नरने मग जडेजाच्या स्वॉर्ड सेलिब्रेशनची कॉपी केली.
Web Title: IPL 2023, DC vs CSK Live Marathi : David Warner doing Sword celebration, A fun banter between Ravindra Jadeja & Warner,Delhi Capitals 26/3, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.