IPL 2023, DC vs GT Live : दोन वेगवान चेंडू, दोन दांडे! एनरिच नॉर्खियाने गुजरातचे धाबे दणाणून सोडले, हार्दिकही परतला माघारी, Video 

दिल्लीचा गोलंदाज एनरिच नॉर्खियाने गुजरात जायंट्सला दोन धक्के दिले. त्याने वृद्धीमान साहा व शुबमन गिल यांचा दोन भन्नाट चेंडूवर त्रिफळा उडवला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 10:19 PM2023-04-04T22:19:20+5:302023-04-04T22:19:50+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, DC vs GT Live : Anrich Nortje on fire - 2 wickets now, Cleans up Wridhiman Saha & Shubman Gill with a 148.8kmph speed, Video | IPL 2023, DC vs GT Live : दोन वेगवान चेंडू, दोन दांडे! एनरिच नॉर्खियाने गुजरातचे धाबे दणाणून सोडले, हार्दिकही परतला माघारी, Video 

IPL 2023, DC vs GT Live : दोन वेगवान चेंडू, दोन दांडे! एनरिच नॉर्खियाने गुजरातचे धाबे दणाणून सोडले, हार्दिकही परतला माघारी, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Delhi Capitals vs Gujarat Titans Live :  दिल्ली कॅपिटल्सची इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील घरच्या मैदानावरील सामन्यातही कामगिरी निराशाजनकच राहिली. दिल्ली कॅपिटल्सचे मनोबल उंचावण्यासाठी दुखापतग्रस्त रिषभ पंत स्टेडियमवर उपस्थित होता. पण, दिल्लीचा गोलंदाज एनरिच नॉर्खियाने गुजरात जायंट्सला दोन धक्के दिले. त्याने वृद्धीमान साहा व शुबमन गिल यांचा दोन भन्नाट चेंडूवर त्रिफळा उडवला. 

केन विल्यमसनच्या जागी स्फोटक फलंदाज GTच्या संघात; भारतीय गोलंदाजांचीही केलीय धुलाई 

गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद शमीने सुरुवातीलाच दिल्लीला दोन धक्के देताना पृथ्वी शॉ  ( ७) व मिचेल मार्श ( ४) यांना माघारी पाठवले. त्यानंतर अल्जारी जोसेफने सलग दोन चेंडूंवर डेव्हिड वॉर्नर (३७) व रायली रुसो ( ०)ला माघारी पाठवले. राशिद खानने त्याच्या पहिल्याच षटकात अभिषेक पोरेलचा ( २०) त्रिफळा उडवला. सर्फराजकडून मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु तो चाचपडताना दिसला. त्याने ३४ चेंडूंत ३० धावा केल्या. राशिद ( ३-३१) आणि शमी ( ३-४१) यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. अक्षर पटेल खिंड लढवताना २२ चेंडूंत २ चौकार व ३ षटकार खेचून ३६ धावांवर माघारी परतला. दिल्लीने ८ बाद १६२ धावा केल्या.  

प्रत्युत्तरात वृद्धीमान साहा व शुबमन गिल यांनी आक्रमक सुरूवात केली. तिसऱ्या षटकात दिल्लीने अनुभवी गोलंदाज एनरिच नॉर्खियाला आणले आणि त्याने साहाचा ( १४) त्रिफळा उडवला. नॉर्खियाने त्याच्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर भन्नाट वेगाने चेंडू टाकून गिलचा ( १४) त्रिफळा उडवला. दिल्लीचा इम्पॅक्ट खेळाडू खलिल अहमदने गुजरातला तिसरा धक्का देताना हार्दिक पांड्याला ( ५) बाद केले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, DC vs GT Live : Anrich Nortje on fire - 2 wickets now, Cleans up Wridhiman Saha & Shubman Gill with a 148.8kmph speed, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.