Join us  

IPL 2023, DC vs GT Live : रिषभ पंत प्रोत्साहन देण्यासाठी आला, पण उपयोग नाही झाला; दिल्ली कॅपिटल्सचा संघ ढेपाळला

IPL 2023, Delhi Capitals vs Gujarat Titans Live :  दिल्ली कॅपिटल्सची इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील घरच्या मैदानावरील सामन्यातही कामगिरी निराशाजनकच राहिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2023 9:24 PM

Open in App

IPL 2023, Delhi Capitals vs Gujarat Titans Live :  दिल्ली कॅपिटल्सची इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील घरच्या मैदानावरील सामन्यातही कामगिरी निराशाजनकच राहिली. पृथ्वी शॉ, मिचेल मार्श व रिली रुसो अपयशी ठरले. डेव्हिड वॉर्नर व सर्फराज खान यांनी चांगला खेळ केला, परंतु त्यांना गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी मोठी खेळी करू दिली नाही. मोहम्मद शमी, अल्जारी जोसेफ यांनी सुरूवातीलाच DC ला धक्के दिले. राशिद खाननेही त्याच्या फिरकीच्या तालावर यजमानांना नाचवले. 

दिल्ली कॅपिटल्सचे मनोबल उंचावण्यासाठी दुखापतग्रस्त रिषभ पंत स्टेडियमवर उपस्थित आहे. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि चेंडू पहिल्यापासून सुरेख वळताना दिसला. मोहम्मद शमीने दुसऱ्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नरची ( David Warner) विकेट मिळवली होती, परंतु नशीबाने त्याची साथ दिली. चेंडू यष्टीला घासून गेला, परंतु बेल्स पडल्या नाही अन् वॉर्नर नाबाद राहिला. पृथ्वी शॉने ( ७) पुन्हा निराश केले. मिचेल मार्शही ( ४) शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला. गुजरातच्या गोलंदाजांनी यजमानांवर दडपण बनवले होते आणि त्याचे फळ नवव्या षटकात मिळाले. अल्जारी जोसेफच्या अप्रतिम चेंडूवर वॉर्नर ३७ धावांवर ( ७ चौकार) त्रिफळाचीत झाला. जोसेफच्या पुढच्याच चेंडूवर रायली रुसो ( ०) चा अफलातून झेल राहुल तेवाटियाने टिपला. 

१३ धावांवर सर्फराज खानचा झेल सुटला. राशिद खानने त्याच्या पहिल्याच षटकात पोरेलचा ( २०) त्रिफळा उडवला. सर्फराजकडून मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु तो चाचपडताना खेळताना दिसला. त्याने ३४ चेंडूंत ३० धावा केल्या, परंतु त्यात आत्मविश्वास नव्हता. राशिदला स्वीप मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. राशिदने ३१ धावांत ३ विकेट्स घेतल्या. उप कर्णधार अक्षर पटेल खिंड लढवताना दिसला. त्याने २२ चेंडूंत २ चौकार व ३ षटकार खेचून ३६ धावांवर माघारी परतला. शमीने ४१ धावांत ३ विकेट्स टिपल्या. दिल्लीने ८ बाद १६२ धावा केल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३दिल्ली कॅपिटल्सगुजरात टायटन्स
Open in App