Join us  

IPL 2023, DC Vs KKR: केकेआरविरुद्ध दिल्लीची ‘करा किंवा मरा’ लढत

IPL 2023, DC Vs KKR: खराब फॉर्ममुळे सलग पाच सामने गमावणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला गुरुवारी आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध विजय मिळविण्याचे आव्हान असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 9:29 AM

Open in App

नवी दिल्ली : खराब फॉर्ममुळे सलग पाच सामने गमावणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला गुरुवारी आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध विजय मिळविण्याचे आव्हान असेल.  हा सामना गमावल्यास दिल्लीची प्ले ऑफची आशा जवळपास संपुष्टात येईल. 

स्थळ : अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली, वेळ : सायंकाळी ७.३० पासून

दिल्ली कॅपिटल्स पृथ्वी शॉला बाहेर बसवून सरफराज खानला सलामीवीर म्हणून खेळविण्याची शक्यता. कर्णधार डेव्हिड वॉर्नरला दुसऱ्या टोकाहून साथ लाभत नाही. अनुभवी मनीष पांडेला बढती मिळणार? मिचेल मार्श तिसऱ्या स्थानावर फेल. रिली रोसौ किंवा रोवमॅन पाॅवेल यांच्यापैकी हकाला मिळू शकेल संधी.

कोलकाता नाइट रायडर्स कर्णधार नीतीश राणा, रिंकूसिंग, आंद्रे रसेल हे धावा काढण्यात तरबेज. गुरबाजऐवजी जेसन रॉयला खेळविणार? लेग स्पिनर सुयश शर्माचा घरच्या मैदानावर पहिला सामना असेल.  व्यंकटेश अय्यरचा फॉर्म संघाच्या यशात मोलाचा वाटा.

टॅग्स :आयपीएल २०२३दिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App