IPL 2023, DC vs KKR Live : डेव्हिड वॉर्नरच्या मेहनतीला अखेर यश मिळाले; १२८ धावांसाठी दिल्ली कॅपिटल्सला अखेरपर्यंत झगडावे लागले

IPL 2023, Delhi Capitals Vs Kolkata Knight Riders Live : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये ५ पराभवानंतर अखेर पहिल्या विजयाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 12:20 AM2023-04-21T00:20:17+5:302023-04-21T00:20:46+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, DC vs KKR Live : David Warner score 57 (41b 11x4 ), Delhi Capitals have defeated KKR with 4 balls to spare. | IPL 2023, DC vs KKR Live : डेव्हिड वॉर्नरच्या मेहनतीला अखेर यश मिळाले; १२८ धावांसाठी दिल्ली कॅपिटल्सला अखेरपर्यंत झगडावे लागले

IPL 2023, DC vs KKR Live : डेव्हिड वॉर्नरच्या मेहनतीला अखेर यश मिळाले; १२८ धावांसाठी दिल्ली कॅपिटल्सला अखेरपर्यंत झगडावे लागले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Delhi Capitals Vs Kolkata Knight Riders Live : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये ५ पराभवानंतर अखेर पहिल्या विजयाची नोंद केली. कोलकाता नाइट रायडर्सच्या १२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना DCला मात्र घाम गाळावा लागला. कर्णधार डेव्हिड वॉर्नर ( David Warner) पुन्हा एकहाती लढला... मनीष पांडेने काही सुरेख फटके मारले, परंतु माफक लक्ष्यासाठी DCला अखेरपर्यंत KKRने संघर्ष करायला लावले. 

दिल्लीच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून दाखवली. एनरिच नॉर्खिया ( २-२०), इशांत शर्मा ( Ishant Sharma), अक्षर पटेल ( २-१३)  व कुलदीप यादव ( २-१५) यांनी प्रत्येकी दोन धक्के दिले. कोलकाता नाइट यारडर्सकडून पदार्पणवीर जेसन रॉयने ( jason roy) संयमी खेळ करून KKR ला सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. आंद्रे रसेलने अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी करताना KKR ला १२७ धावांपर्यंत पोहोचवले. दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये खेळणाऱ्या इशानने ४-०-१९-२ अशी स्पेल टाकली. जेसन रॉयने ४३ आणि रसेलने नाबाद ३८ धावा केल्या. या दोघांशिवाय फक्त मनदीप सिंगने ( १२) दुहेरी धावा केल्या. DC च्या गोलंदाजांनी जवळपास ६७ चेंडू निर्धाव टाकली. 


डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांना आज चांगली सुरूवात करून देण्याची संधी होती. दोघांनी काही सुरेख फटकेही मारले, परंतु पृथ्वी ( १३) पुन्हा अपयशी ठरला. मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग निराश दिसले. दरम्यान, वॉर्नरने KKRविरुद्ध १०००+ धावा केल्या आणि आयपीएलमध्ये दोन संघांविरुद्ध १०००+ ( KKR & PBKS) धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. वॉर्नरने पॉवर प्लेच्या अखेरच्या षटकात सुनील नरीनच्या गोलंदाजीवर चार चौकार खेचून संघाची धावसंख्या १ बाद ६१ अशी आणली. मिचेल मार्शचाही ( २) खराब फॉर्म कायम राहिला अन् नितीश राणाने ही विकेट मिळवून दिली. फिल सॉल्टही ( ५) लगेच माघारी परतल्याने सामन्याला कलाटणी मिळते की काय, अशी चिंता वाटू लागली. 


वॉर्नरने आज ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि आयपीएल २०२३ मधील हे त्याचे चौथे व जलद अर्धशतक ठरले. दिल्लीला विजयासाठी ३५ धावांची गरज असताना वॉर्नर पायचीत झाला. त्याने ४१ चेंडूंत ११ चौकारांसह ५७ धावा केल्या. मनीष पांडेने १५व्या षटकात ११ धावा काढून थोडसं दडपण कमी केलं. अनुकुलने आजची दुसरी विकेट घेताना मनीषला ( २१) माघारी पाठवले. DCला २५ चेंडूंत १८ धावांची गरज असताना ही महत्त्वाची विकेट पडली. अनुकुलने ४-०-१९-२ अशी गोलंदाजी केली. नितिश राणानेही दुसरी विकेट घेताना अमन खानला ( ०) त्रिफळाचीत केले. ललित यादवला स्टम्पिंग करण्याची एक संधी आणि एक झेल असे दोन जीवदान मिळाले. 


वरुण चक्रवर्थीने टाकलेले १८वे षटक अप्रतिम होते आणि दिल्लीवरील दडपण वाढवण्याची त्याने कोणतीच कसर सोडली नव्हती. ११ चेंडू ११ धावा अशी मॅच आली. बॉल आणि चेंडू यांचा योग्य संपर्कच होत नसल्याने DCचे फलंदाज हताश झालेले पाहायला मिळाले. वरुणने ४-१-१६-२ अशी उत्तम गोलंदाजी केली. नितिशने १९व्या षटकात ५ धावा दिल्याने आता ६ चेंडूंत ७ असा सामना आला. नितिशने १७ धावांत २ विकेट्स घेतल्या. अक्षरने पहिल्या दोन चेंडूंवर दोन-दोन धावा घेतल्या. त्यात नो बॉल टाकला. अक्षरने ( १९*) आणखी दोन धावा घेत ४ विकेट्सने सामना जिंकला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, DC vs KKR Live : David Warner score 57 (41b 11x4 ), Delhi Capitals have defeated KKR with 4 balls to spare.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.