IPL 2023, DC vs LSG Live : ९ चेंडूंत ५० धावा! कायले मायर्सचे वादळ, निकोलस पूरननेही केली धुलाई; दिल्लीसमोर तगडे आव्हान 

IPL 2023, Delhi Capitals vs Lucknow Super Giants Live : लखनौ सुपर जायंट्सने कायले मायर्सची ( Kyle Mayers ) अनपेक्षित निवड करताना दिल्ली कॅपिटल्सचा बुचकळ्यात टाकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 09:18 PM2023-04-01T21:18:25+5:302023-04-01T21:19:55+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, DC vs LSG Live : Kyle Mayers scored 73 runs in just 38 balls with 2 fours and 7 sixes,  Nicholas Pooran - 36 (21), K Gowtham smashes a six off the only ball he faces to end Lucknow innings at 193/6 | IPL 2023, DC vs LSG Live : ९ चेंडूंत ५० धावा! कायले मायर्सचे वादळ, निकोलस पूरननेही केली धुलाई; दिल्लीसमोर तगडे आव्हान 

IPL 2023, DC vs LSG Live : ९ चेंडूंत ५० धावा! कायले मायर्सचे वादळ, निकोलस पूरननेही केली धुलाई; दिल्लीसमोर तगडे आव्हान 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Delhi Capitals vs Lucknow Super Giants Live : लखनौ सुपर जायंट्सने कायले मायर्सची ( Kyle Mayers ) अनपेक्षित निवड करताना दिल्ली कॅपिटल्सचा बुचकळ्यात टाकले. मायर्सने मिळालेल्या संधीचं सोनं करताना दिल्लीच्या गोलंदाजांना धू धू धुतले आणि मिळालेल्या जीवदानाचा त्याने पुरेपूर फायदा उचलून लखनौला मोठी धावसंख्या उभी करून दिली. मायर्सनंतर आणखी एक कॅरेबियन खेळाडू निकोलस पूरन याने अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी केली.  आयुष बदोनीने अखेरचे षटक गाजवले. 

दिल्ली कॅपिटल्सच्या 'एका' कृतीने सर्वांना इमोशनल केले; असं काय आहे या फोटोत घ्या जाणून

दिल्ली कॅपिटल्सने रिषभ पंतची जर्सी डग आऊटवर टांगली होती आणि त्यांच्या या कृतीने सर्वांची मनं जिंकली.  दिल्लीच्या चेतन सकारियाने चौथ्या षटकात लखनौचा कर्णधार लोकेश राहुल ( ८) याला बाद केले. कायले मायर्सचा सोपा झेल खलिल अहमदने टाकला अन् तोच महागात पडला. त्याने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. दीपक हुडा व मायर्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४२ चेंडूंत ७९ धावांची भागीदारी केली. यापैकी ६२ धावा ( २४ चेंडू) या मायर्सने चोपल्या होत्या. कुलदीप यादवच्या गुगलीवर हुडा ( १७) झेलबाद झाला. 

लखनौने कृणाल पांड्याला प्रमोशन देताना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. मायर्स आज वादळ आणतोय असे दिसत असताना अक्षर पटेलने अप्रतिम चेंडू टाकला. मायर्स ३८ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांसह ७३ धावांवर त्रिफळाचीत झाला. डोकेदुखी ठरणाऱ्या मार्कस स्टॉयनिसला ( १२) खलिलने बाद करून दिल्लीला मोठं यश मिळवून दिले. एक कॅरेबियन खेळाडू बाद झाल्यानंतर निकोलस पूरन दिल्लीचं टेंशन वाढवताना दिसला. पूरनने २१ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३६ धावा केल्या. खलिलच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉने चांगला झेल टिपला. खलिलने ३० धावांत दोन विकेट्स घेतल्या. लखनौने २० षटकांत ६ बाद १९३ धावा केल्या. आयुष बदोनीने ७ चेंडूंत १८ चेंडू कुटल्या. चेतनने त्याची विकेट घेतली. दिल्लीने अखेरच्या चेंडूवर इम्पॅक्ट खेळाडू म्हणून के गौथमला पाठवले अन् त्याने षटकार खेचला.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

Web Title: IPL 2023, DC vs LSG Live : Kyle Mayers scored 73 runs in just 38 balls with 2 fours and 7 sixes,  Nicholas Pooran - 36 (21), K Gowtham smashes a six off the only ball he faces to end Lucknow innings at 193/6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.