Join us  

IPL 2023, DC vs LSG Live : पृथ्वी शॉ तावात मारायला गेला अन् मार्क वूडने त्रिफळा उडवला, दिल्लीला सलग २ विकेट्सचा धक्का, Video 

IPL 2023, Delhi Capitals vs Lucknow Super Giants Live : धावांचा डोंगर उभा केल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सने गोलंदाजीतही कमाल केलेली दिसतेय.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 10:12 PM

Open in App

IPL 2023, Delhi Capitals vs Lucknow Super Giants Live : धावांचा डोंगर उभा केल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सने गोलंदाजीतही कमाल केलेली दिसतेय. १९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ व डेव्हिड वॉर्नर यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. पण, मार्क वूडच्या दोन चेंडूंने मॅच फिरवली. 

लोकेश राहुलने ( ८) सुरेख षटकार खेचून चाहत्यांना आशेचा किरण दाखवला, परंतु चेतन सकारियाने चतुराईने त्याला बाद केला. लखनौ सुपर जायंट्सने कायले मायर्सची ( Kyle Mayers ) अनपेक्षित निवड करताना दिल्ली कॅपिटल्सचा बुचकळ्यात टाकले. दीपक हुडा व मायर्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४२ चेंडूंत ७९ धावांची भागीदारी केली. यापैकी ६२ धावा ( २४ चेंडू) या मायर्सने चोपल्या होत्या. कुलदीप यादवच्या गुगलीवर हुडा ( १७) झेलबाद झाला. मायर्स ३८ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांसह ७३ धावांवर त्रिफळाचीत झाला. निकोलस पूरनने २१ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३६ धावा केल्या. लखनौने २० षटकांत ६ बाद १९३धावा केल्या. आयुष बदोनीने ७ चेंडूंत १८ चेंडू कुटल्या. अखेरच्या चेंडूवर लखनौने इम्पॅक्ट खेळाडू म्हणून उतरवलेल्या के गौथमने षटकार खेचला.

डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी अपेक्षित आक्रमक सुरूवात केली. पण, मार्क वूडने पाचव्या षटकात सर्व समिकरण बिघडवलं. पृथ्वी शॉ ( १२) आणि मिचेल मार्श ( ०) यांना सलग चेंडूवर वूडने त्रिफळाचीत केले. वूडची हॅटट्रिक मात्र हुकली. तिसरा चेंडू नो बॉल ठरला अन् त्यानंतर फ्री हिटवर सर्फराज खान झेलबाद झाला. पण, नो बॉलमुळे ती विकेट मिळाली नाही. पुढील षटकात वूडने बाऊन्सरवर सर्फराजलाही ( ४) माघारी पाठवून दिल्लीची अवस्था ३ बाद ४८ अशी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :आयपीएल २०२३दिल्ली कॅपिटल्सलखनौ सुपर जायंट्स
Open in App