Join us  

IPL 2023 : मुंबई इंडियन्सची घोषणा, जसप्रीत बुमराहच्या जागी टीम इंडियाचा खेळाडू संघात; रिषभ पंतचीही रिप्लेसमेंट ठरली

IPL 2023 , Rishabh Pant & Jasprit Bumrah's replacement announced : मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये खेळू शकणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 3:57 PM

Open in App

IPL 2023 , Rishabh Pant & Jasprit Bumrah's replacement announced : मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये खेळू शकणार नाही. पाठीच्या दुखापतीनंतर त्याच्यावर न्यूझीलंड येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. सप्टेंबरमध्ये तो भारताकडून शेवटचा सामना खेळला होता आणि तेव्हापासून तो संघाबाहेर आहे. त्याच्याबाबत बीसीसीआय कोणताही धोका पत्करू शकत नाही आणि त्यामुळे त्याला आयपीएल २०२३ मधून माघार घ्यावी लागली आहे. जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत या दोघांना एकत्र खेळताना पाहण्याची MI चाहत्यांची संधी पुन्हा हुकली. आज मुंबई इंडियन्सने जसप्रीतची रिप्लेसमेंट जाहीर केली आहे. दिल्ली कॅपिटल्सनेही रिषभ पंतची रिप्लेसमेंट जाहीर केली. रिषभला अपघातामुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. 

विराट कोहलीने दहाव्या टॅटूतून दिला लाखमोलाचा संदेश; जाणून घ्या त्याच्या प्रत्येक टॅटूमागची गोष्ट 

जसप्रीत बुमराहच्या जागी मुंबई इंडियन्सने संघात उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज संदीप वॉरियर याचा समावेश केला आहे. संदीपने २०२१ मध्ये भारतासाठी पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याच्या त्याच्याकडे अनुभव आहे. ३१ वर्षीय संदीप यापूर्वी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्य या संघांचा भाग होता. आयपीएलमध्ये ६ सामन्यात त्याने २ विकेट घेतल्या आहेत. भारताकडून खेळलेल्या एकमेव सामन्यात त्याला यश मिळाले नाही. संदीपने २०१२ मध्ये केरळसाठी पदार्पण केले आणि आता तो तामिळनाडूकडून खेळतो. त्याने ६८ ट्वेंटी-२० सामन्यांत ६२ विकेट्स घेतल्या आहेत. ६९ लिस्ट ए मॅचेसमध्ये ८३ विकेट्स आणि ६६ फर्स्ट क्लास मॅचमध्ये २१७  विकेट्स त्याच्या नावावर आहेत.  

दिल्ली कॅपिटल्सने रिषभच्या जागी  संघात अभिषेक पोरेलचा समावेश केला आहे. यष्टीरक्षक-फलंदाज पोरेल याने बंगालकडून ३ लिस्ट ए आणि तेव़ढेच ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. २० लाखांत पोरेल दिल्लीच्या संघात, तर ५० लाखांत संदीप मुंबईच्या संघात दाखल झाला आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३जसप्रित बुमराहरिषभ पंतमुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स
Open in App