IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) पुढील हंगाम 31 मार्चपासून सुरू होत आहे. महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा या लीगमध्ये चेन्नीई सुपर किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. या लीगसाठी धोनीने तयारीही सुरू केली आहे. पण आयपीएलपूर्वी तो सध्या रॉकस्टारच्या भूमिकेत शिरला आहे. एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्यात धोनी गिटारच्या तालावर इतर खेळाडूंना नाचवताना दिसत आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. या संघाला चार वेळा हे विजेतेपद पटकावण्यात यश आले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने हे चारही जेतेपद पटकावले आहे. दरम्यान, चेन्नईने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी रॉकस्टार स्टाईलमध्ये दिसत आहे.
धोनीच्या हातात गिटार आहे आणि तो गिटार वाजवत आहे. या व्हिडिओमध्ये धोनीसोबत ऋतुराज गायकवाड आहे, शिवम दुबे आणि दीपक चहरही या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. हे सर्व लोक गिटारच्या तालावर नाचताना आणि मस्ती करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ एखाद्या जाहिरातीच्या किंवा प्रोमो शूटिंगदरम्यानचा आहे.
धोनीचा शेवटचा आयपीएल?
धोनी आयपीएलच्या सुरुवातीपासून म्हणजेच 2008 पासून चेन्नई सुपर किंग्जसोबत आहे. हे आयपीएल त्याचे शेवटचे आयपीएल असू शकते. धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले होते, पण तो आयपीएल खेळत आहे. पण, यंदाचा आयपीएल त्याचा शेवटचा असू शकतो अशी चर्चा आहे.
Web Title: IPL 2023, Dhoni became a rockstar, make dance Chahar-Gaikwad on guitar beats ; Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.