Join us  

IPL 2023, Eliminator MI vs LSG Live : ३.३-०-५-५! आकाश मढवाल MIचा हिरो बनला, IPL मध्ये कधी न झालेला पराक्रम केला

टेनिस बॉलवर सराव करणाऱ्या या खेळाडूने आज मुंबई इंडियन्ससाठी मोठा पराक्रम केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 11:44 PM

Open in App

IPL 2023, Eliminator Mumbai Indians vs Lucknow Super Giants Live Marathi : उत्तराखंड मधील रुरकी येथील धांडेरा येथील आकाश मढवाल हा रिषभ पंतचा शेजारी आहे आणि त्याने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आहे. आकाशचे घर रिषभच्या समोर आहे. ते शेजारी आहेत. २०१३ मध्ये झालेल्या एका दुर्घटनेत मढवाल याने भारतीय सैन्यात असलेले वडील गमावले, पण आकाशचे क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचा भाऊ झटला. टेनिस बॉलवर सराव करणाऱ्या या खेळाडूने आज मुंबई इंडियन्ससाठी मोठा पराक्रम केला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात आकाशने ३.३ षटकांत ५ धावा देत ५ विकेट्स घेत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. आयपीएल इतिहासात प्ले ऑफच्या सामन्यात पाच विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. 

कॅमेरून ग्रीन ( ४१) आणि सूर्यकुमार यादव ( ३३) यांची ३८ चेंडूंत ६६ धावांची भागीदारी आणि तिलक वर्मा ( २६) व नेहाल वढेराने १२ चेंडूंत २३ धावा चोपून मुंबईला ८ बाद १८२ धावांपर्यंत पोहोचवले. नवीनने ४-०-३८-४ अशी महत्त्वाची स्पेल टाकली.  प्रत्युत्तरात आकाश मढवालने सामना एकतर्फी केला. मुंबई इंडियन्सने दणदणीत विजय मिळवताना क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला आता यजमान गुजरात टायटन्सचा सामना करावा लागणार आहे. मुंबईने आज लखनौ सुपर जायंट्सवर ८१ धावांनी विजय मिळवला. आकाशने ३.३-०-५-५ विकेट्स घेत लखनौचा संपूर्ण संघ १०१ धावांत तंबूत पाठवला अन् मुंबईने ८१ धावांनी सामना जिंकला. 

आयपीएलमध्ये प्ले ऑफ किंवा नॉक आऊटमधील सर्वोत्तम कामगिरी आकाश मझवाल (MI) - 5/5 vs LSG (2023)*डग बॉलिंजर (CSK) - 4/13 vs DCH (2010)धवल कुलकर्णी (GL) - 4/14 vs RCB (2016)जसप्रीत बुमराह (MI) - 4/14 vs DC (2020)अनिल कुंबळे (RCB) - 4/16 vs DCH (2009)कर्ण शर्मा (MI) - 4/16 vs KKR (2017)

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सलखनौ सुपर जायंट्स
Open in App