IPL 2023, Eliminator Mumbai Indians vs Lucknow Super Giants Live Marathi : गुजरात टायटन्सच्या कृपेने प्ले ऑफसाठी पात्र ठरलेल्या मुंबई इंडियन्सला आज साजेशी कामगिरी करता आली नाही. महत्त्वाच्या सामन्यात तरी रोहित शर्माची बॅट तळपेल असे वाटले होते, परंतु लखनौ सुपर जायंट्सच्या नवीन उल हकने हिटमॅनसह MIच्या स्टार फलंदाजांना गपगार केले. यश ठाकूरनेही इशान किशनला माघारी पाठवून मोठा धक्का दिलाच होता. नवीनने ४ मोठ्या विकेट्स घेऊन सामन्यात LSGला फ्रंटसीटवर बसवले. मुंबईने कशीबशी समाधानकारक धावसंख्या गाठली.
मुंबई इंडियन्सला अवघ्या ३८ धावांत दोन धक्के बसले. रोहित ( ११) आणि इशान ( १५) माघारी परतल्यानंतर मागील सामन्यातील शतकवीर कॅमेरून ग्रीन आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव चांगला सावरला. दोघांनी मजबूत फटकेबाजी करून प्रेक्षकांचा उत्साह वाढवला. कृणालने पुन्हा नवीनला गोलंदाजीला आणले अन् त्याने ११व्या षटकात MIच्या दोन्ही सेट फलंदाजांना माघारी पाठवले. सूर्या २० चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३३ धावांत तंबूत परतला. ग्रीनसोबत ३८ चेंडूंत ६६ धावांची भागीदारी संपुष्टात आली.सहाव्या चेंडूवर कॅमेरूनचा दांडा उडवला. तो २३ चेंडूंत ४१ धावांवर बाद झाला. ( IPL 2023, Eliminator MI vs LSG Live scorboard मराठीतून )
'कोहली'च्या नावाने नवीन उल हकला डिवचले, पण त्रास मुंबई इंडियन्सला झाला, Video
मुंबई इंडियन्सचे सलामीवीर माघारी; LSGच्या मालकांनी खिशातून 'तो' फोटो काढला अन्...
तिलक वर्मा आणि टीम डेव्हिड यांनी मुंबईची पडझड थांबवली. रवी बिश्नोई ( ०-३०) व कृणाल पांड्या ( ०-३८) यांना आज विकेट मिळवण्यात अपयश आले. डेव्हिड आक्रमणाला सुरूवात करताना दिसला, परंतु यश ठाकूरने फुलटॉसवर त्याला झेल देण्यास भाग पाडले. तिसऱ्या अम्पायरने No Ball न दिल्याने डेव्हिड ( १३) नाराज झाला. त्याने तिलकसह ४३ धावा जोडल्या होत्या. १८व्या षटकात नवीनने आणखी एक धक्का देताना तिलकला ( २६) बाद केले. नवीनने ४-०-३८-४ अशी महत्त्वाची स्पेल टाकली. मोहसिन खानने १९व्या षटकार ख्रिस जॉर्डनला ( ४) बाद करून मुंबईचे टेंशन आणखी वाढवले. नेहालने १२ चेंडूंत २३ धावा चोपून मुंबईला ८ बाद १८२ धावांपर्यंत पोहोचवले.