IPL 2023, Eliminator MI vs LSG Live : 'कोहली'च्या नावाने नवीन उल हकला डिवचले, पण त्रास मुंबई इंडियन्सला झाला, Video 

नवीन उल हकला चेपॉकच्या प्रेक्षकांनी कोहली... कोहली... च्या नावाने डिवचले अन् ते मुंबई इंडियन्सला ते महागात पडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 08:36 PM2023-05-24T20:36:21+5:302023-05-24T20:37:06+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, Eliminator MI vs LSG Live Marathi : Cameron Green dismissed for 41 in 23 balls, Naveen Ul Haq on fire with 3 wickets, Mumbai Indians 105/4, Video  | IPL 2023, Eliminator MI vs LSG Live : 'कोहली'च्या नावाने नवीन उल हकला डिवचले, पण त्रास मुंबई इंडियन्सला झाला, Video 

IPL 2023, Eliminator MI vs LSG Live : 'कोहली'च्या नावाने नवीन उल हकला डिवचले, पण त्रास मुंबई इंडियन्सला झाला, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Eliminator Mumbai Indians vs Lucknow Super Giants Live Marathi : नवीन उल हकला चेपॉकच्या प्रेक्षकांनी कोहली... कोहली... च्या नावाने डिवचले अन् ते मुंबई इंडियन्सला ते महागात पडले. LSG vs RCB सामन्यात नवीन आणि विराट कोहली यांच्यात तुफान राडा झाला होता आणि त्यानंतर प्रत्येक सामन्यात नवीन उल हकला कोहलीच्या नावाने डिवचले जाते. पण, आज त्याने प्रेक्षकांसोबत मुंबई इंडियन्सलाही गप्प केले. 

मुंबई इंडियन्सला अवघ्या ३८ धावांत दोन धक्के बसले. लखनौचा कर्णधार कृणाल पांड्याने फिरकीपटूंनी मारा सुरू केला, परंतु रोहित शर्मा व इशान किशन यांनी त्यांना चोपले. त्यानंतर चौथ्या षटकात जलदगती गोलंदाज नवीन उल हकला गोलंदाजीला आणले. चेपॉकवर कोहली... कोहली... चा नारा घुमला... पण नवीनने MIचा कर्णधार रोहितला ( ११)  बाद केले अन् सर्व प्रेक्षक गप्प झाले. त्यानंतर पुढच्या षटकात यश ठाकूरने  MIचा दुसरा सलामीवीर इशानला ( १५)  बाद केले. यावेळी LSGचे मालक संजीव गोएंका खिशातून फोटो काढून देवाचे आभार मानताना दिसले. मुंबईने ३८ धावांत दोन्ही सलामीवीरांना गमावले. पण, सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीन यांनी फटकेबाजी करून पॉवर प्लेमध्ये संघाला ६२ धावांपर्यंत पोहोचवले. ( IPL 2023, Eliminator MI vs LSG Live scorboard मराठीतून ) 


मुंबई इंडियन्सचे सलामीवीर माघारी; LSGच्या मालकांनी खिशातून 'तो' फोटो काढला अन्...


मागील सामन्यातील शतकवीर कॅमेरून ग्रीनचे फटके वाखाण्याजोग होते. मोहसिन खानच्या षटकात दोघांनी खणखणीत सिक्स मारले आणि तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. सूर्याने यंदाच्या पर्वात ५४४+ धावांचा टप्पा ओलांडला अन् त्याची ही आयपीएल पर्वातील सर्वाधिक धावसंख्या आहे. यापूर्वी २०१८मध्ये त्याने ५१२ धावा केल्या होत्या. कृणालने पुन्हा नवीनला गोलंदाजीला आणले अन् त्याने सूर्याला लेटकटरला फटका मारण्यास भाग पाडले. सूर्या २० चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३३ धावांत तंबूत परतला. ग्रीनसोबत ३८ चेंडूंत ६६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. त्याच षटकात नवीनने सहाव्या चेंडूवर कॅमेरूनचा दांडा उडवला. तो २३ चेंडूंत ४१ धावांवर बाद झाला. नवीनची ही तिसरी विकेट ठरली.

Web Title: IPL 2023, Eliminator MI vs LSG Live Marathi : Cameron Green dismissed for 41 in 23 balls, Naveen Ul Haq on fire with 3 wickets, Mumbai Indians 105/4, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.