IPL 2023, Eliminator Mumbai Indians vs Lucknow Super Giants Live Marathi : मुंबई इंडियन्सने दणदणीत विजय मिळवताना क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला आता यजमान गुजरात टायटन्सचा सामना करावा लागणार आहे. मुंबईने आज लखनौ सुपर जायंट्सवर ८१ धावांनी विजय मिळवला. आकाश मढवालने ( Akash Madhwal ) ५ विकेट्स घेत अप्रतिम गोलंदाजी केली आणि त्याच्या एका षटकाने पूर्ण मॅच फिरली. लखनौच्या फलंदाजही नंतर गांगरले अन् तिघे Run Out होऊन माघारी परतले. Eliminator मध्ये पाच विकेट्स घेणार आकाश हा पहिलाच गोलंदाज ठरला.
१८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कायल मायर्स ( १८) व प्रेरक मंडक ( ३) झटपट माघारी परतले. मार्कस स्टॉयनिसने लखनौचा डाव सावरला होता, परंतु समोर कोण उभं राहायलाच मागत नव्हता. कृणाल पांड्यानेही ( ८) घाई केली अन् विकेट फेकली. आकाश मढवालने १०व्या षटकात आयुष बदोनीची ( १) दांडी काढली आणि पुढच्याच चेंडूवर निकोलस पूरनला भोपळ्यावर बाद केले. इथे लखनौच्या हातून सामना गेला. त्यात आशेचा शेवटचा किरण असलेला स्टॉयनिस रन आऊट झाला. दुसरी धाव घेताना स्टॉयनिस व दीपक हुडा यांच्यात टक्कर झाली आणि तोपर्यंत टीम डेव्हिडने यष्टिरक्षक इशान किशनकडे चेंडू फेकून LSGच्या फलंदाजाला रन आऊट केले. स्टॉयनिस २७ चेंडूंत ४० धावांवर बाद झाला.
पुढच्याच षटकात कृष्णप्पा गौथमही ( २) रन आऊट झाल्याने लखनौची अवस्था ७ बाद ९२ अशी झाली. मढवालने सामन्यातील चौथी विकेट घेताना रवी बिश्नोईला बाद केले आणि लखनौचा आठवा फलंदाज माघारी परतला. दीपक हुडाही रन आऊट होऊन माघारी परतला. आकाशने ३.३-०-५-५ विकेट्स घेत लखनौचा संपूर्ण संघ १०१ धावांत तंबूत पाठवला अन् मुंबईने ८१ धावांनी सामना जिंकला. (Who is Akash Madhwal? इंजिनिअर, टेनिस बॉल क्रिकेटर अन् आता मुंबई इंडियन्सचा विकेट टेकर! )
कोहली'च्या नावाने नवीन उल हकला डिवचले, पण त्रास मुंबई इंडियन्सला झाला, Video
मुंबई इंडियन्सचे सलामीवीर माघारी; LSGच्या मालकांनी खिशातून 'तो' फोटो काढला अन्...
तत्पूर्वी, रोहित ( ११) आणि इशान ( १५) माघारी परतल्याने मुंबईची अवस्था २ बाद ३८ झाली. मागील सामन्यातील शतकवीर कॅमेरून ग्रीन ( ४१) आणि सूर्यकुमार यादव ( ३३) यांनी ३८ चेंडूंत ६६ धावांची भागीदारी केली. तिलक वर्मा आणि टीम डेव्हिड ( १३) यांनी मुंबईची पडझड थांबवली. दोघांनी ४३ धावा जोडल्या. १८व्या षटकात नवीनने आणखी एक धक्का देताना तिलकला ( २६) बाद केले. नवीनने ४-०-३८-४ अशी महत्त्वाची स्पेल टाकली. नेहालने १२ चेंडूंत २३ धावा चोपून मुंबईला ८ बाद १८२ धावांपर्यंत पोहोचवले.
Web Title: IPL 2023, Eliminator MI vs LSG Live Marathi : MUMBAI INDIANS QUALIFIED FOR QUALIFIER 2, Akash Madhwal is the hero take 5 wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.