Join us  

No Ball or not a no ball? टीम डेव्हिड अम्पायरच्या निर्णयावर नाराज झाला, सामना तिथे फिरला, Video 

IPL 2023, Eliminator Mumbai Indians vs Lucknow Super Giants Live Marathi : मुंबई इंडियन्सच्या सलामीवीरांना आज साजेशी सुरुवात करून देता आली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 9:48 PM

Open in App

IPL 2023, Eliminator Mumbai Indians vs Lucknow Super Giants Live Marathi : मुंबई इंडियन्सच्या सलामीवीरांना आज साजेशी सुरुवात करून देता आली नाही. पण, सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीन यांनी काहीकाळ लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांचा सामना करून डाव सावरला. नवीन उल हकने ४ धक्के देताना MIला बॅकफूटवर फेकले, परंतु टीम डेव्हिडच्या ( Tim David) विकेटने वादाला तोंड फोडले. यश ठाकूरच्या फुलटॉसवर डेव्हिड झेलबाद झाला अन् तिसऱ्या अम्पायरच्या निर्णयाने तो नाराज होऊन तंबूत परतला. 

रोहित ( ११) आणि इशान ( १५) माघारी परतल्याने मुंबईची अवस्था २ बाद ३८ झाली. मागील सामन्यातील शतकवीर कॅमेरून ग्रीन ( ४१) आणि सूर्यकुमार यादव ( ३३) यांनी ३८ चेंडूंत ६६ धावांची भागीदारी केली. तिलक वर्मा आणि टीम डेव्हिड यांनी मुंबईची पडझड थांबवली. डेव्हिड आक्रमणाला सुरूवात करताना दिसला, परंतु यश ठाकूरने फुलटॉसवर त्याला झेल देण्यास भाग पाडले. तिसऱ्या अम्पायरने No Ball  न दिल्याने डेव्हिड ( १३) नाराज झाला. त्याने तिलकसह ४३ धावा जोडल्या होत्या. ( IPL 2023, Eliminator MI vs LSG Live scorboard मराठीतून ) 

'कोहली'च्या नावाने नवीन उल हकला डिवचले, पण त्रास मुंबई इंडियन्सला झाला, Video 

मुंबई इंडियन्सचे सलामीवीर माघारी; LSGच्या मालकांनी खिशातून 'तो' फोटो काढला अन्...

 

१८व्या षटकात नवीनने आणखी एक धक्का देताना तिलकला ( २६) बाद केले. नवीनने ४-०-३८-४ अशी महत्त्वाची स्पेल टाकली. मोहसिन खानने १९व्या षटकार ख्रिस जॉर्डनला ( ४) बाद करून मुंबईचे टेंशन आणखी वाढवले.  नेहालने १२ चेंडूंत २३ धावा चोपून मुंबईला ८ बाद १८२ धावांपर्यंत पोहोचवले.

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सलखनौ सुपर जायंट्स
Open in App