मुंबई इंडियन्सचा 'इंजिनियर' चमकला; २ चेंडूंत २ विकेट्स घेत LSGचे ६ फलंदाज पाठवले माघारी

IPL 2023, Eliminator Mumbai Indians vs Lucknow Super Giants Live Marathi : मुंबई इंडियन्सने उभ्या केलेल्या १८३ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सचा डाव गडगडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 10:50 PM2023-05-24T22:50:35+5:302023-05-24T22:53:47+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, Eliminator MI vs LSG Live Marathi : Two outstanding deliveries from Akash Madhwal to get two BIG wickets, LSG 75/5 after 10 overs, Video | मुंबई इंडियन्सचा 'इंजिनियर' चमकला; २ चेंडूंत २ विकेट्स घेत LSGचे ६ फलंदाज पाठवले माघारी

मुंबई इंडियन्सचा 'इंजिनियर' चमकला; २ चेंडूंत २ विकेट्स घेत LSGचे ६ फलंदाज पाठवले माघारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Eliminator Mumbai Indians vs Lucknow Super Giants Live Marathi : मुंबई इंडियन्सने उभ्या केलेल्या १८३ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सचा डाव गडगडला. आकाश मढवालने ( Akash Madhwal) दोन चेंडूंत सामना मुंबईच्या पारड्यात झुकवला अन् त्यामुळे LSGचा निम्मा संघ १० षटकांतच माघारी परतला. 

रोहित ( ११) आणि इशान ( १५) माघारी परतल्याने मुंबईची अवस्था २ बाद ३८ झाली. मागील सामन्यातील शतकवीर कॅमेरून ग्रीन ( ४१) आणि सूर्यकुमार यादव ( ३३) यांनी ३८ चेंडूंत ६६ धावांची भागीदारी केली. तिलक वर्मा आणि टीम डेव्हिड ( १३)  यांनी मुंबईची पडझड थांबवली. दोघांनी ४३ धावा जोडल्या. १८व्या षटकात नवीनने आणखी एक धक्का देताना तिलकला ( २६) बाद केले. नवीनने ४-०-३८-४ अशी महत्त्वाची स्पेल टाकली. मोहसिन खानने १९व्या षटकार ख्रिस जॉर्डनला ( ४) बाद करून मुंबईचे टेंशन आणखी वाढवले.  नेहालने १२ चेंडूंत २३ धावा चोपून मुंबईला ८ बाद १८२ धावांपर्यंत पोहोचवले. ( पाहा नवीन उल हकच्या ४ विकेट्स


लखनौचीही सुरुवात काही खास झाली नाही.. कायल मायर्स व प्रेरक मंडक सलामीला आले. पण, एकदा रन आऊट पासून वाचल्यानंतरही मंकड ( ३) झेलबाद होऊन माघारी परतला. आकाश मढवालने ही विकेट मिळवून दिली. ख्रिस जॉर्डनने मोठी विकेट मिळवून दिली, कायल मायर्स ( १८) ग्रीनच्या हाती झेल देऊन परतला. मार्कस स्टॉयनिसचा झेल पकडण्याची संधी मुंबईच्या क्षेत्ररक्षकाने गमावली. स्टॉयनिसने पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात हृतिक शोकीनला १८ धावा कुटल्या आणि LSG ला २ बाद ५४ धावांपर्यंत पोहोचवले. कृणाल पांड्यावर स्टॉयनिसला साथ देण्याची जबाबदारी होती, परंतु पियूष चावल्याच्या गोलंदाजीवर त्याने घाई केली अन् ८ धावांवर स्वतःची विकेट फेकली. लखनौला ११ षटकांत १०९ धावा करायच्या होत्या. (Who is Akash Madhwal? इंजिनिअर, टेनिस बॉल क्रिकेटर अन् आता मुंबई इंडियन्सचा विकेट टेकर!

टीम डेव्हिड अम्पायरच्या निर्णयावर नाराज झाला, सामना तिथे फिरला, Video 

कोहली'च्या नावाने नवीन उल हकला डिवचले, पण त्रास मुंबई इंडियन्सला झाला, Video 

मुंबई इंडियन्सचे सलामीवीर माघारी; LSGच्या मालकांनी खिशातून 'तो' फोटो काढला अन्...

रोहितही आज डाईव्ह मारून अप्रतिम क्षेत्ररक्षण करत होता. रोहितने विकेट मिळवण्यासाठी आकाश मढवालला आणले अन् त्याने आयुष बदोनीची ( १) दांडी काढली. पुढच्याच चेंडूवर आकाशने LSGच्या पॉवर हिटर निकोलस पूरनला भोपळ्यावर बाद केले. LSG च्या १० षटकांत ५ बाद ७५ धावा झाल्या. स्टॉयनिस आणि दीपक हुडा यांच्यात धाव घेताना धडक झाली अन् लखनौचा सहावा फलंदाज ८९ धावांवर माघारी परतला. ( IPL 2023, Eliminator MI vs LSG Live scorboard मराठीतून ) 

Web Title: IPL 2023, Eliminator MI vs LSG Live Marathi : Two outstanding deliveries from Akash Madhwal to get two BIG wickets, LSG 75/5 after 10 overs, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.