IPL 2023, Eliminator Mumbai Indians vs Lucknow Super Giants Live Marathi : मुंबई इंडियन्सने उभ्या केलेल्या १८३ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सचा डाव गडगडला. आकाश मढवालने ( Akash Madhwal) दोन चेंडूंत सामना मुंबईच्या पारड्यात झुकवला अन् त्यामुळे LSGचा निम्मा संघ १० षटकांतच माघारी परतला.
रोहित ( ११) आणि इशान ( १५) माघारी परतल्याने मुंबईची अवस्था २ बाद ३८ झाली. मागील सामन्यातील शतकवीर कॅमेरून ग्रीन ( ४१) आणि सूर्यकुमार यादव ( ३३) यांनी ३८ चेंडूंत ६६ धावांची भागीदारी केली. तिलक वर्मा आणि टीम डेव्हिड ( १३) यांनी मुंबईची पडझड थांबवली. दोघांनी ४३ धावा जोडल्या. १८व्या षटकात नवीनने आणखी एक धक्का देताना तिलकला ( २६) बाद केले. नवीनने ४-०-३८-४ अशी महत्त्वाची स्पेल टाकली. मोहसिन खानने १९व्या षटकार ख्रिस जॉर्डनला ( ४) बाद करून मुंबईचे टेंशन आणखी वाढवले. नेहालने १२ चेंडूंत २३ धावा चोपून मुंबईला ८ बाद १८२ धावांपर्यंत पोहोचवले. ( पाहा नवीन उल हकच्या ४ विकेट्स)
लखनौचीही सुरुवात काही खास झाली नाही.. कायल मायर्स व प्रेरक मंडक सलामीला आले. पण, एकदा रन आऊट पासून वाचल्यानंतरही मंकड ( ३) झेलबाद होऊन माघारी परतला. आकाश मढवालने ही विकेट मिळवून दिली. ख्रिस जॉर्डनने मोठी विकेट मिळवून दिली, कायल मायर्स ( १८) ग्रीनच्या हाती झेल देऊन परतला. मार्कस स्टॉयनिसचा झेल पकडण्याची संधी मुंबईच्या क्षेत्ररक्षकाने गमावली. स्टॉयनिसने पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात हृतिक शोकीनला १८ धावा कुटल्या आणि LSG ला २ बाद ५४ धावांपर्यंत पोहोचवले. कृणाल पांड्यावर स्टॉयनिसला साथ देण्याची जबाबदारी होती, परंतु पियूष चावल्याच्या गोलंदाजीवर त्याने घाई केली अन् ८ धावांवर स्वतःची विकेट फेकली. लखनौला ११ षटकांत १०९ धावा करायच्या होत्या. (Who is Akash Madhwal? इंजिनिअर, टेनिस बॉल क्रिकेटर अन् आता मुंबई इंडियन्सचा विकेट टेकर! )
टीम डेव्हिड अम्पायरच्या निर्णयावर नाराज झाला, सामना तिथे फिरला, Video
कोहली'च्या नावाने नवीन उल हकला डिवचले, पण त्रास मुंबई इंडियन्सला झाला, Video
मुंबई इंडियन्सचे सलामीवीर माघारी; LSGच्या मालकांनी खिशातून 'तो' फोटो काढला अन्...
रोहितही आज डाईव्ह मारून अप्रतिम क्षेत्ररक्षण करत होता. रोहितने विकेट मिळवण्यासाठी आकाश मढवालला आणले अन् त्याने आयुष बदोनीची ( १) दांडी काढली. पुढच्याच चेंडूवर आकाशने LSGच्या पॉवर हिटर निकोलस पूरनला भोपळ्यावर बाद केले. LSG च्या १० षटकांत ५ बाद ७५ धावा झाल्या. स्टॉयनिस आणि दीपक हुडा यांच्यात धाव घेताना धडक झाली अन् लखनौचा सहावा फलंदाज ८९ धावांवर माघारी परतला. ( IPL 2023, Eliminator MI vs LSG Live scorboard मराठीतून )