IPL 2023 Retention; CSK Retained Players LIST: चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याला संघात कायम ठेवले. आयपीएल २०२२नंतर Ravindra Jadeja आणि Chennai Super Kings यांच्यातील संबंध ताणले गेले होते. अष्टपैलू खेळाडूने त्याच्या सोशल मीडियावरील CSK संबंधित सर्व पोस्ट डिलिट केल्या होत्या. त्यामुळे आयपीएल २०२३ मध्ये जडेजा दुसऱ्या संघाकडून खेळेल असा अंदाज बांधला जात होता, परंतु तो CSKच्या पिवळ्या जर्सीतच दिसणार आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) मध्यस्थी करून जडेजा व CSK यांच्यातला वाद मिटवला अन् भारताच्या स्टार खेळाडूला संघात राहण्यासाठी मनधरणी केली. त्यानंतर जडेजानेही ‘Everything is fine’ #Restart असे तीन शब्दांचं ट्विट केलं आणि त्यात धोनीसोबतचा फोटो पोस्ट केला.
CSK, MI, RCB सह सर्व फ्रँचायझींनी जाहीर केली अंतिम लिस्ट; पाहा कोणाच्या बटव्यात किती रक्कम
आयपीएल २०२२ ला सुरुवात होण्याआधी महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ही जबाबदारी रवींद्र जडेजाच्या ( Ravindra Jadeja) खांद्यावर सोपवली गेली. ६-७ सामन्यानंतर पदरी अपयश पडल्यानंतर जडेजाकडून नेतृत्व काढून घेतले आणि पुन्हा धोनी फ्रेममध्ये आला. पण, त्यानंतर जडेजा नाराज असल्याचे जाणवले आणि त्याच्या कृतीतून ती नाराजी प्रकर्षाने समोर आली. IPL 2022 च्या लिलावात जडेजाला १५ कोटींत CSK ने ताफ्यात कायम राखले आणि ही किंमत धोनीपेक्षाही अधिक आहे. जडेजाने २१० आयपीएल सामन्यांत २५०२ धावा व १३२ विकेट्स घेतल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings )
- रिलीज केलेले खेळाडू - ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, अॅडम मिल्न्, हरी निशांथ, ख्रिस जॉर्डन, भगत वर्मा, केएम आसीफ, नारायण जगदीसन
- पर्समध्ये शिल्लक रक्कम - २०.४५ कोटी
- परदेशी खेळाडूंची रिक्त जागा - २
- कायम राहिलेले खेळाडू - महेंद्रसिंग धोनी, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, शुभ्रांशू सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हणंगर्गेकर, ड्वेन प्रेटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीष पथिराना, सिमरजीत सिंग, दीपक चहर, प्रशांत सोलंकी, महीष थिक्साना
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023 : Everything is fine RESTART, Ravindra Jadeja tweet goes viral after CSK retain him; MS Dhoni works as mediator between all rounder and Chennai Super kings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.