Join us  

IPL 2023, Fact Chek : तुषार देशपांडेने खरंच MI कर्णधार रोहित शर्माचा अपमान केला? CSK गोलंदाजाची इस्टा स्टोरी व्हायरल

Tushar Deshpande's Instagram story - इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना रंगल्यानंतर तुषार देशपांडेचे वक्तव्य सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 4:24 PM

Open in App

Tushar Deshpande's Instagram story - इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना रंगल्यानंतर तुषार देशपांडेचे वक्तव्य सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. या वक्तव्यात CSKचा गोलंदाज तुषारने MI चा कर्णधार रोहित शर्माचा अपमान करणारे विधान केल्याचा उल्लेख होता. त्यानंतर सोशल मीडियावर तुषार देशपांडेवर क्रिकेट चाहत्यांकडून टीका झाली. आता CSKच्या मध्यमगती गोलंदाजाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

IPL 2023 मध्येच सोडून गेला अन् करोडपती पोरीशी उरकलं लग्न!

त्या सामन्यात तुषारने मुंबई इंडियन्सच्यारोहित शर्माचा त्रिफळा उडवला होता. सामन्यानंतर हे वक्तव्य सोशल मीडियावर समोर आले. यामध्ये तुषारने रोहित शर्माची विकेट घेणे खूप सोपे असल्याचे सांगितले होते. तो विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्ससारखा नाही, असेही त्याने म्हटल्याचे सांगण्यात आले होते.  

तुषारने हे विधान पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे. रविवारी रात्री त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये त्यानी सोशल मीडियावर चालणाऱ्या अशा बातम्यांचे स्क्रीनशॉट घेतले आणि त्यावर थ्रोबॅक लिहिले. तुषारने आपल्या स्पष्टीकरणात असेही लिहिले आहे की, 'सर्व दिग्गज खेळाडूंचा मला पूर्ण आदर आहे. मी अशी अपमानास्पद विधाने कधीच केली नाहीत आणि करणारही नाहीत. मी सर्व दिग्गज खेळाडूंचा आदर करतो. अशा खोट्या बातम्या पसरवणे थांबवा.''

तुषारने मुंबई इंडियन्सविरुद्ध शानदार गोलंदाजी केली होती. त्याने प्रथम स्फोटक फलंदाजी करणाऱ्या रोहितला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि नंतर धोकादायक टीम डेव्हिडला बाद करून मुंबईला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. तुषारने तीन षटकांत ३१ धावा देत दोन गडी बाद केले. या सामन्यात मुंबई संघाला केवळ १५७  धावा करता आल्या, प्रत्युत्तरात चेन्नईने तीन गडी गमावून सहज लक्ष्य गाठले.

 

टॅग्स :आयपीएल २०२३रोहित शर्माचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सऑफ द फिल्ड
Open in App