IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आणखी एक थरारक सामना पाहायला मिळाला. चेन्नई सुपर किंग्सने २२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना खराब सुरूवात होऊनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेरपर्यंत संघर्ष केला. फॅफ ड्यू प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल यांच्या १२६ धावांच्या स्फोटक भागीदारीने सामन्याला पूर्णपणे कलाटणी दिली. फॅफड्या बरगड्या दुखपत असतानाही त्याने कॅप्टन्स इनिंग्ज खेळली. महेंद्रसिंग धोनीने या दोन्ही सेट फलंदाजांचे अप्रतिम झेल टिपले अन् मॅच CSKच्या तराजूत पडली. चेन्नईने ८ धावांनी हा सामना जिंकला, परंतु ३८ वर्षीय फॅफची फिटनेस अन् त्याच्या बरगड्यावर लिलिलेल्या فضل या ऊर्दू टॅटूची चर्चा रंगली आहे.
RCBचा कर्णधार फॅफच्या शरीरावर अनेक टॅटू आहेत. त्याच्या हातावर “Dies a Domino XVII I MMXI” अशा आशयाचं टॅटू आहे आणि ते त्याच्या लॉर्ड्सवरील पदार्पणाचं प्रतिक आहे. दुसऱ्या बाजूला “Agape”असं लिहिलेलं आहे. याचा अर्थ निस्वार्थ प्रेम असा होतो. पण, काल "فضل" या टॅटूने सर्वांचे लक्ष वेधलं 'फजल' असा हा अरेबियन शब्द आहे. याचा अर्थ 'कृपा", आणि सर्वशक्तिमानावर विश्वास ठेवणारा, असा होतो.
कालच्या सामन्यात काय घडलं? ऋतुराजला ( ३) स्वस्तात माघारी जावे लागले. पण, अजिंक्य रहाणे ( ३७) व डेव्हॉन कॉनवे ( ८३) यांनी ४३ चेंडूंत ७४ धावांची भागीदारी केली. शिवम दुबे ( ५२) आणि कॉनवे यांनी ३७ चेंडूंत ८० धावांची भागीदारी केली. कॉनवे ४५ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह ८३ धावांवर बाद झाला. चेन्नईने ६ बाद २२६ धावा केल्या. प्रत्युत्तरात इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या आकाश सिंगने पहिल्याच षटकात विराट कोहलीची ( ६) विकेट मिळवून दिली. त्यानंतर तुषार देशपांडेने महिपाल लोम्रोरला ( ०) माघारी पाठवले.
फॅफ ड्यू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी CSKच्या गोलंदाजांनी चांगली धुलाई केली. मॅक्सवेल ३६ चेंडूंत ३ चौकार व ११ षटकारांसह ७६ धावांवर बाद झाला. मॅक्सवेल व फॅफची ६१ चेंडूंतील १२६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. फॅफ ३३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ६२ धावांवर धोनीच्या हाती झेलबाद झाला. त्यानंतर RCBचा डाव गडगडला अन् त्यांना ८ बाद २१८ धावाच करता आल्या. चेन्नईने ८ धावांनी हा सामना जिंकला.