आम्ही प्ले ऑफ खेळण्यासाठी 'पात्र' नव्हतोच! RCB कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस स्पष्ट बोलला

IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आयपीएल जेतेपद पटकावण्याचे स्वप्न १६व्या पर्वातही अपूरे राहिले. रविवारी अखेरच्या साखळी सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सकडून त्यांना हार मानावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 04:59 PM2023-05-22T16:59:21+5:302023-05-22T16:59:37+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 : Faf Du Plessis said "we don't deserve to be in the Play-offs if we take the whole 14 games, it hurts but we fell short". | आम्ही प्ले ऑफ खेळण्यासाठी 'पात्र' नव्हतोच! RCB कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस स्पष्ट बोलला

आम्ही प्ले ऑफ खेळण्यासाठी 'पात्र' नव्हतोच! RCB कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस स्पष्ट बोलला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आयपीएल जेतेपद पटकावण्याचे स्वप्न १६व्या पर्वातही अपूरे राहिले. रविवारी अखेरच्या साखळी सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सकडून त्यांना हार मानावी लागली. १४ सामन्यांत ७ विजय व ७ पराभवांमुळे त्यांना १४ गुणांसह सहाव्या क्रमांकावर समाधानी रहावे लागले. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचे मात्र भलं झालं अन् ते प्ले ऑफसाठी पात्र ठरले. कालच्या निकालानंतर RCBचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf Du Plessis) याने आमचाय संघ इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील सर्वोत्तम संघांपैकी एक नव्हताच आणि आम्ही प्ले ऑफ खेळण्याच्या लायकीचेच नव्हतो, असे स्पष्ट मत मांडले. 

विराट कोहलीनं आता RCBची साथ सोडावी! दिग्गज खेळाडूचा सल्ला अन् सूचवला नवा संघ

"हे कठीण आहे कारण आम्हाला शेवटच्या सामन्यासाठी खूप आशा होत्या. आम्हाला माहित होते की आम्ही आज रात्री एक मजबूत संघ म्हणून खेळत आहोत. शेवटच्या दोन सामन्यांच्या निकालानंतर, आम्ही चांगल्या फॉर्मसह प्लेऑफमध्ये जाण्यास उत्सुक होतो. गुजरात टायटन्सनसारख्या आघाडीच्या संघाविरुद्धच्या खेळताना तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खेळात अव्वल असणे आवश्यक आहे," असे ड्यू प्लेसिस म्हणाला.


ड्यू प्लेसिसने शुबमनचेही कौतुक केले, ज्याने ५२ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद १०४ धावा काढल्या. आरसीबीच्या कर्णधाराने सांगितले की संपूर्ण हंगामात संघाने काही चमकदार वैयक्तिक कामगिरी केली होती, परंतु एक युनिट म्हणून कामगिरी करण्यात अपयशी ठरला. "आम्ही फार दूर नव्हतो. शुबमन गिलने अविश्वसनीय खेळी खेळली. आमचा हंगाम इथे संपला हे निराशाजनक आहे, पण या वर्षी ग्लेन मॅक्सवेलच्या रूपाने आमच्याकडे काही सकारात्मक गोष्टी होत्या. विराट अविश्वसनीय होता. माझी आणि विराटची भागीदारी अविश्वसनीय झाली होती आणि ते सातत्य उल्लेखनीय होते,” तो म्हणाला. 


"सिराजची कामगिरी अप्रतिम झाली आहे. पण काही आघाड्यांवर आम्हाला सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आले. जर आम्ही १४ सामन्यांच्या एकत्रित कामगिरी पाहिली तर आम्ही स्पर्धेतील सर्वोत्तम संघ नव्हतोच... या प्रवासात काही चांगल्या कामगिरी झाल्या, हेच आमचं नशीब, परंतु एकंदरीत आम्ही प्ले ऑफमध्ये खेळण्यास पात्र नव्हतोच.. आम्ही आज प्रयत्न केला, परंतु अपयशी ठरलो,''असेही तो म्हणाला. 
 

Web Title: IPL 2023 : Faf Du Plessis said "we don't deserve to be in the Play-offs if we take the whole 14 games, it hurts but we fell short".

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.