Join us  

धोनीच्या चाहत्यांची अख्खी रात्र रेल्वे स्टेशनवरच, पावसाने 'खेळ मोडला', फोटो व्हायरल

लांबून प्रवास करून आलेले चाहते सामना रद्द झाल्याने रेल्वे स्टेशनवरच झोपलेले पाहायला मिळाले 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 4:26 PM

Open in App

IPL 2023 Final GT vs CSK: स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रविवारी होणार होता. पण पावसामुळे सामना होऊ शकला नाही. पाऊस थांबेल म्हणून साऱ्यांनी बराच वेळ वाट पाहिली पण पाऊस थांबला नाही. त्यामुळे अखेर रविवारचा सामना रद्द करण्यात आला. आता आज, राखीव दिवशी हा सामना खेळला जाणार आहे. गुजरात आणि चेन्नई संघाचे चाहते काल मोठ्या संख्येने सामना पाहायला आले होते. अनेक जण लांबून लांबून आले होते. पण सामना रद्द केल्यामुळे नरेंद्र मोदी स्टेडियममधील चाहते नाराज झाले आणि दुसऱ्या दिवशी सामना पाहायला यायचे म्हणून अनेकांनी रेल्वे स्टेशनवरच मुक्काम ठोकला आणि फोटोही व्हायरल झाला.

एमएस धोनी हा लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. रविवारी त्याचे स्टारडम पुन्हा एकदा दिसून आले. नरेंद्र मोदी स्टेडियमवर बहुतांश स्टेडियम पिवळ्या रंगाच्या जर्सींनी भरले होते. धोनीची एक झलक पाहण्यासाठी लांबून लोक आले होते आणि गर्दी जमली होती. हे त्याचे शेवटचे आयपीएल असू शकते अशा बातम्या येत असल्याने लोकांनी तोबा गर्दी केली. चाहत्यांना सीएसकेच्या कर्णधाराला शेवटच्या वेळी पाहायचे असल्याने लोकांनी पावसापाण्याची पर्वा न करता स्टेडियममध्ये हजेरी लावली. मात्र पावसाने संपूर्ण खेळ खराब केला. त्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला. सामना पुढे ढकलल्यानंतर धोनीचे चाहते अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर झोपलेले फोटो व्हायरल होत आहेत.

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीअहमदाबादनरेंद्र मोदी
Open in App