Join us  

IPL 2023 Final, GT vs CSK Live : पावसाची सुरुवात, मैदानावर कव्हर्स टाकले, राखीव दिवसही नाही; मॅच न झाल्यास काय होणार?

IPL 2023 Final, Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Marathi : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज चेन्नई सुपर किंग्सचे चाहते मोठ्या संख्येने आलेले पाहायला मिळतेय...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 6:34 PM

Open in App

IPL 2023 Final, Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Marathi : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज चेन्नई सुपर किंग्सचे चाहते मोठ्या संख्येने आलेले पाहायला मिळतेय... महेंद्रसिंग धोनीची ( MS Dhoni) आयपीएलमधील ही शेवटची मॅच असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्यामुळे Captain Cool ला पाहण्यासाठी ही गर्दी जमली आहे. यंदाच्या पर्वात चेपॉकसह सर्व स्टेडियमवर जिथे जिथे CSK ची मॅच झाली, तिथे हेच चित्र पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सचे समर्थक कमी, तर पिवळ्या जर्सीतील फॅन्स जास्त आहेत.

 धोनीचा हा २५०वा आयपीएल सामना असणार आहे आणि हा पल्ला गाठणारा तो पहिला खेळाडू आहे.  धोनीनंतर रोहित शर्मा ( २४३), दिनेश कार्तिक ( २४२), विराट कोहली ( २३७ ) आणि रवींद्र जडेजा ( २२५) यांनी सर्वाधिक आयपीएल सामने खेळले आहेत. पण, नाणेफेकीला अर्धा तास शिल्लक असताना पावसाची सुरूवात झाली आहे आणि खेळपट्टीवर कव्हर्स टाकण्यात आले आहेत. पावसाचा जोर अधिक वाढला आहे आणि वीजाही चमकत आहेत.. 

सामना न झाल्यास कोण विजयी ठरेल?IPL Final साठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही, त्यामुळे पावसामुळे सामना रद्द करावा लागल्यास साखळी फेरीतील गुणांच्या आधारे विजयी संघ ठरवला जाईल. असे झाल्यास २० गुणांसह टॉपर राहिलेल्या गुजरात टायटन्सकडे जेतेपदाची ट्रॉफी कायम राहिल.   

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्स
Open in App