IPL 2023 Final GT vs CSK Live : MS Dhoni ने इतिहास रचला! चाहत्याचं प्रेम पाहून भारावला अन् म्हणाला, त्यांच्यासाठी...

IPL 2023 Final Gujarat Titans vs Chennai Super Kings Live marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या फायनलची प्रतीक्षा आज अखेर संपणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 07:06 PM2023-05-29T19:06:26+5:302023-05-29T19:07:04+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 Final GT vs CSK Live Marathi: CSK have won the toss and they've decided to bowl first, MS Dhoni said, "the crowd has suffered a lot due to rain yesterday. Hopefully we'll entertain them". | IPL 2023 Final GT vs CSK Live : MS Dhoni ने इतिहास रचला! चाहत्याचं प्रेम पाहून भारावला अन् म्हणाला, त्यांच्यासाठी...

IPL 2023 Final GT vs CSK Live : MS Dhoni ने इतिहास रचला! चाहत्याचं प्रेम पाहून भारावला अन् म्हणाला, त्यांच्यासाठी...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023 Final Gujarat Titans vs Chennai Super Kings Live marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या फायनलची प्रतीक्षा आज अखेर संपणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातली फायनल रविवारी पावसामुळे स्थगित करावी लागली. लाखोच्या संख्येने चाहते काल मोठ्या आशेने रात्री ११ वाजेपर्यंत मॅच सुरू होईल यासाठी भर पावसात भिजत उभे राहिले होते. काल पावसामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागला असला तरी चाहत्यांचा उत्साह आजही कायम आहे. CSKचा अष्टपैलू मोईन अली याने टीम बसमधून फ्रँचायझीसाठी जमलेल्या गर्दीचा व्हिडीओ पोस्ट केला आणि हे प्रेम पाहून या फ्रँचायझीचा भाग असल्याचा अभिमान असल्याचेही त्याने लिहिले. 


 GTला जेतेपद कायम राखून इतिहास घडविण्याची, तर CSKला मुंबई इंडियन्सच्या ५ जेतेपदांची बरोबरी करण्याची संधी आहे. CSK ने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ मध्ये आयपीएल जेतेपद उंचावले आहेत. महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) हा २५०वा आयपीएल सामना असणार आहे आणि हा पल्ला गाठणारा तो पहिला खेळाडू आहे.  धोनीनंतर रोहित शर्मा ( २४३), दिनेश कार्तिक ( २४२), विराट कोहली ( २३७ ) आणि रवींद्र जडेजा ( २२५) यांनी सर्वाधिक आयपीएल सामने खेळले आहेत. महेंद्रसिंग धोनीने टॉस उडवला अन् हार्दिक पांड्या हेड्स म्हणाला... पण, नाणेफेकीचा कौल धोनीच्या बाजूने लागला अन् चेन्नईने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

पावसाचा अंदाज असल्याने हा निर्णय घेतल्याचे धोनीने सांगितले. महेंद्रसिंग धोनीला कालच्या पावसाबद्दल विचारले असता तो म्हणाला, काल प्रेक्षकांना पावसामुळे खूप त्रास सहन करावा लागला आणि आशा करतो की आज आम्ही त्यांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरू... 

आयपीएल फायनल खेळणारा धोनी हा वयस्कर खेळाडू ठरला
४१ वर्ष व ३२६ दिवस - महेंद्रसिंग धोनी
४० वर्ष व १०० दिवस - महेंद्रसिंग धोनी, २०२१
४० वर्ष व ४६ दिवस - इम्रान ताहीर, २०१९
 

Web Title: IPL 2023 Final GT vs CSK Live Marathi: CSK have won the toss and they've decided to bowl first, MS Dhoni said, "the crowd has suffered a lot due to rain yesterday. Hopefully we'll entertain them".

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.