IPL 2023 Final, GT vs CSK Live : पावसाचा विजय! चेन्नई सुपर किंग्स-गुजरात टायटन्स फायनल स्थगित, उद्या होणार लढत

IPL 2023 Final, Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Marathi : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 10:56 PM2023-05-28T22:56:54+5:302023-05-28T22:58:13+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 Final, GT vs CSK Live Marathi : Gujarat Titans vs Chennai Super Kings match has been moved to the reserve day, final will happen tomorrow. | IPL 2023 Final, GT vs CSK Live : पावसाचा विजय! चेन्नई सुपर किंग्स-गुजरात टायटन्स फायनल स्थगित, उद्या होणार लढत

IPL 2023 Final, GT vs CSK Live : पावसाचा विजय! चेन्नई सुपर किंग्स-गुजरात टायटन्स फायनल स्थगित, उद्या होणार लढत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023 Final, Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Marathi : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला. सायंकाळी ६ वाजल्यापासून अहमदाबाद येथे वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाने अखेर ९ वाजता विश्रांती घेतली. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज अंतिम सामना येथे  खेळवला जाणार आहे. पण, चाहत्यांना खूपच वाट पाहावी लागत आहे. पावसाने १५ मिनिटांच्या विश्रांतीनंतर पुन्हा हजेरी लावली. पावसासोबत अहमदाबादमध्ये काही भागात गाराही पडल्या. मुसळधार पावसामुळे अखेर आज होणारा सामना स्थगित केला गेला अन् उद्या ही फायनल सायंकाळी ७.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. 


९ वाजता थांबला, परंतु १५ मिनिटांची विश्रांती घेऊन पुन्हा धो-धो पाऊस सुरू झाला आहे. अम्पायर्स मैदानाची पाहणी करत असताना पावसाची पुन्हा एन्ट्री झाली. पाऊस थांबण्याचं नाव घेत नसल्याने अखेर आजची मॅच उद्या खेळवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. दोन्ही संघांनी ५-५ षटकांचा सामना खेळण्यास नकार दिला. किमान १०-१० षटकं त्यांना खेळायची होती, परंतु परिस्थिती पाहता ते शक्य नसल्याने आजचा सामना स्थगित करण्याचा निर्णय घेतला. अम्पायर रॉड टकर यांनी दिलेल्या माहितीनुसार १२.०६ पर्यंत सामना होऊ शकला असता, परंतु त्यासाठी किमान एक तास आधी पाऊस थांबावला हवा होता. पण, ११ नंतरही पाऊस सुरू राहिल्याने हा निर्णय घेतला गेला. 


 

Web Title: IPL 2023 Final, GT vs CSK Live Marathi : Gujarat Titans vs Chennai Super Kings match has been moved to the reserve day, final will happen tomorrow.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.