IPL 2023 Final, Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Marathi : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला आणि अखेर ११ वाजता सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. सायंकाळी ६ वाजल्यापासून अहमदाबाद येथे वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाने अखेर ९ वाजता १५ मिनिटांसाठी विश्रांती घेतली होती. त्यामुळे चाहते काहीकाळ आनंदात होती. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातला सामना आता सोमवारी म्हणजेच २९ मे रोजी खेळवला जाणार आहे आणि चाहत्यांना तिकीट सांभाळून ठेवण्याचं आवाहन केलं गेलं आहे. पण, उद्या पुन्हा पावसाने थैमान घातल्यास, काय होईल, कोण जिंकेल?
९ वाजता पाऊस थांबल्यानंतर अम्पायर्स मैदानाची पाहणी करत असताना पावसाची पुन्हा एन्ट्री झाली. पाऊस थांबण्याचं नाव घेत नसल्याने अखेर आजची मॅच सोमवारी खेळवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. दोन्ही संघांनी ५-५ षटकांचा सामना खेळण्यास नकार दिला. किमान १०-१० षटकं त्यांना खेळायची होती, परंतु परिस्थिती पाहता ते शक्य नसल्याने सामना स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
weather.com नुसार उद्याची पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय.. अशा वेळी जर पावसामुळे पुन्हा मॅच न झाल्यात साखळी फेरीतील टॉपर गुजरात टायटन्सला विजयी घोषित केलं जाईल.
Web Title: IPL 2023 Final, GT vs CSK Live Marathi : Gujarat Titans vs Chennai Super Kings match has been moved to the reserve day, know weather report in ahmedabad tomorrow, What if the reserve day (i.e. 29th May) gets washed out?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.