Join us  

IPL 2023 Final, GT vs CSK Live : काय सांगतं सोमवारचं हवामान? राखीव दिवसही रद्द झाल्यास कोण ट्रॉफी उंचावणार?

IPL 2023 Final, Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Marathi : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला आणि अखेर ११ वाजता सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेतला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 11:14 PM

Open in App

IPL 2023 Final, Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Marathi : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला आणि अखेर ११ वाजता सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. सायंकाळी ६ वाजल्यापासून अहमदाबाद येथे वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाने अखेर ९ वाजता १५ मिनिटांसाठी विश्रांती घेतली होती. त्यामुळे चाहते काहीकाळ आनंदात होती. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातला सामना आता सोमवारी म्हणजेच २९ मे रोजी खेळवला जाणार आहे आणि चाहत्यांना तिकीट सांभाळून ठेवण्याचं आवाहन केलं गेलं आहे. पण, उद्या पुन्हा पावसाने थैमान घातल्यास, काय होईल, कोण जिंकेल? 

९ वाजता पाऊस थांबल्यानंतर अम्पायर्स मैदानाची पाहणी करत असताना पावसाची पुन्हा एन्ट्री झाली. पाऊस थांबण्याचं नाव घेत नसल्याने अखेर आजची मॅच सोमवारी खेळवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. दोन्ही संघांनी ५-५ षटकांचा सामना खेळण्यास नकार दिला. किमान १०-१० षटकं त्यांना खेळायची होती, परंतु परिस्थिती पाहता ते शक्य नसल्याने  सामना स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

weather.com नुसार उद्याची पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय.. अशा वेळी जर पावसामुळे पुन्हा मॅच न झाल्यात साखळी फेरीतील टॉपर गुजरात टायटन्सला विजयी घोषित केलं जाईल. 

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्सपाऊस
Open in App