IPL 2023 Final, Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Marathi : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरून मोठी बातमी समोर येतेय... 2022 च्या आयपीएल प्रमाणे यंदाही फायनल साठी एक राखीव दिवस ठेवण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज अंतिम सामना होणार आहे, परंतु पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर वाढत चालला आहे आणि वीजाही कडाडत आहेत. त्यामुळे आज सामना न झाल्यात उद्या म्हणजेच सोमवारी ही मॅच खेळवण्यात येईल. उद्याची अशीच परिस्थिती राहिली तर दोन्ही संघांना विजयी घोषित केले जाईल. पण, आज किमान ५-५ षटकं जरी झाली तरी निकाल आजच ठरेल.
महेंद्रसिंग धोनीची ( MS Dhoni) आयपीएलमधील ही शेवटची मॅच असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्यामुळे Captain Cool ला पाहण्यासाठी ही गर्दी जमली आहे. धोनीचा हा २५०वा आयपीएल सामना असणार आहे आणि हा पल्ला गाठणारा तो पहिला खेळाडू आहे. धोनीनंतर रोहित शर्मा ( २४३), दिनेश कार्तिक ( २४२), विराट कोहली ( २३७ ) आणि रवींद्र जडेजा ( २२५) यांनी सर्वाधिक आयपीएल सामने खेळले आहेत. पण, नाणेफेकीला अर्धा तास शिल्लक असताना पावसाची सुरूवात झाली आहे आणि खेळपट्टीवर कव्हर्स टाकण्यात आले आहेत. पाऊस 10.10 पर्यंत थांबल्यास एकही षटक कमी न होता मॅच खेळवण्यात आली. परिस्थिती जैसे थे राहिल्यास उद्या ही मॅच होईल.