Join us  

मैदानावर पाऊल ठेवताच MS Dhoni इतिहास रचणार; असा पराक्रम जो प्रथमच होणार

IPL 2023 Final, Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ची फायनल आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन तगड्या संघांमध्ये होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 5:45 PM

Open in App

IPL 2023 Final, Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ची फायनल आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन तगड्या संघांमध्ये होणार आहे. सामना जरी गुजरातच्या घरच्या मैदानावर होत असला तरी येथे MS Dhoni समर्थक अधिक संख्येने दिसत आहेत. स्टेडियमबाहेर पिवळा जनसागर लोटलेला पाहायला मिळतोय. GTला जेतेपद कायम राखून इतिहास घडविण्याची, तर CSKला मुंबई इंडियन्सच्या ५ जेतेपदांची बरोबरी करण्याची संधी आहे. CSK ने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ मध्ये आयपीएल जेतेपद उंचावले आहेत. महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) हा २५०वा आयपीएल सामना असणार आहे आणि हा पल्ला गाठणारा तो पहिला खेळाडू आहे.

Special Blog : महेंद्रसिंग धोनी आज पाचवं IPL टायटल जिंकून निवृत्ती घेणार की पुन्हा चकवा देणार?

धोनीने आतापर्यंत आयपीएलच्या प्रत्येक पर्वात सहभाग घेतला आहे. २००८मध्ये त्याने चेन्नईचे नेतृत्व हाती घेतलं. २०१६ व २०१७ मध्ये तो रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला. २०१८मध्ये पुन्हा CSKचे पुनरागमन झाले अन् धोनीकडे पुन्हा नेतृत्व गेलं. २०२२मध्ये धोनीने नेतृत्व सोडलं होतं अन् रवींद्र जडेजाकडे ती जबाबदारी दिली गेली. पण, संघाची कामगिरी ठिक न झाल्याने धोनी पुन्हा कर्णधारपदी आला. धोनीनंतर रोहित शर्मा ( २४३), दिनेश कार्तिक ( २४२), विराट कोहली ( २३७ ) आणि रवींद्र जडेजा ( २२५) यांनी सर्वाधिक आयपीएल सामने खेळले आहेत.   

 

महेंद्रसिंग धोनीची कारकीर्दमहेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७चा ट्वेंटी-२०, २०११ चा वन डे वर्ल्ड कप जिंकला आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. आयसीसीच्या या तिन्ही स्पर्धा जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे. त्याने ९० कसोटींत ६  शतकं व ३३ अर्धशतकांसह ४८७६ धावा केल्या आहेत. ३५० वन डे सामन्यांत त्याच्या नावावर १०७७३ धावा आणि १० शतकं व ७३ अर्धशतकं आहेत. ९८ ट्वेंटी-२०त त्याने १९१७ धावा केल्या आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्स
Open in App