IPL 2023 Final Gujarat Titans vs Chennai Super Kings Live marathi : महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ अशी ५ आयपीएल जेतेपदं नावावर केली आहेत. मुंबई इंडियन्सनंतर आयपीएलची पाच जेतेपदं नावावर असलेला CSK दुसरा संघ ठरला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे CSK समोर १५ षटकांत १७१ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले आणि सामना अत्यंत चुरशीचा झाला, परंतु रवींद्र जडेजाने शेवटच्या २ चेंडूंवर १० धावा करून रोमहर्षक विजय मिळवून दिला. मध्यरात्री ३ वाजेपर्यंत धोनीला ऐकण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित होते आणि त्यांना जे अपेक्षित होते, तेच धोनीने केले.
आयपीएलमध्ये सर्वाधिक २५० सामन्यांत धोनीने ५०८२ धावा केल्या आहेत. त्यात २४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने १४२ झेल व ४२ स्टम्पिंग्सही केले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७चा ट्वेंटी-२०, २०११ चा वन डे वर्ल्ड कप जिंकला आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. आयसीसीच्या या तिन्ही स्पर्धा जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे. त्याने ९० कसोटींत ६ शतकं व ३३ अर्धशतकांसह ४८७६ धावा केल्या आहेत. ३५० वन डे सामन्यांत त्याच्या नावावर १०७७३ धावा आणि १० शतकं व ७३ अर्धशतकं आहेत. ९८ ट्वेंटी-२०त त्याने १९१७ धावा केल्या आहेत.