IPL 2023 Final Gujarat Titans vs Chennai Super Kings Live marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या फायनलची प्रतीक्षा आज अखेर संपली. पावसामुळे कालचा दिवस वाया गेल्यानंतर आज चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातली फायनल होतेय...नाणेफेक जिंकून महेंद्रसिंग धोनीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊन मोठी चूक केली. तशी आकडेवारी समोर आली आहे आणि त्यामुळे CSKचे फॅन्स टेंशनमध्ये आले आहेत.
महेंद्रसिंग धोनीने टॉस उडवला अन् हार्दिक पांड्या हेड्स म्हणाला... पण, नाणेफेकीचा कौल धोनीच्या बाजूने लागला अन् चेन्नईने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसाचा अंदाज असल्याने हा निर्णय घेतल्याचे धोनीने सांगितले. धोनी ( ४१ वर्ष व ३२६ दिवस) हा आयपीएल फायनल खेळणारा वयस्कर खेळाडू ठरला. यापूर्वीही २०२१ मध्ये तो ४० वर्ष व १०० दिवसांचा असताना फायनल खेळला होता.
चेन्नई सुपर किंग्स - ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, दीपक चहर, तुषार देशपांडे, महिष तीक्षणा, मथिशा पथिराणा; राखीव - शिवम दुबे, मिचेल सँटनर, सुभ्रांषू सेनापती, शेक राशीद, आकाश सिंग
गुजरात टायटन्स - शुबमन गिल, वृद्धीमान साहा, बी साई सुदर्शन, हार्दिक पांड्या, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राशीद खान, राहुल तेवातिया, नूर अहमद, मोहित शर्मा, मोहम्मद शमी; राखीव - जॉश लिटल, ओडीन स्मिथ, केएस भरत, शिवम मावी, आर साई किशोर
विषम दिवशी झालेल्या आयपीएल फायनल अन् निकाल ( IPL Finals results in odd years)2009 - Chasing team lost.2011 - Chasing teams lost.2013 - Chasing team lost.2015 - Chasing team lost.2017 - Chasing team lost.2019 - Chasing team lost.2021 - Chasing team lost.2023 - GT are batting first tonight.